IPL 2021: पृथ्वीने 6 चेंडूत 6 चौकार मारल्यांनंतर शिवम मावीने घेतला ''असा'' बदला; पहा VIDEO  

PRUTHVI SHAW
PRUTHVI SHAW

KKR vs DC:  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात पृथ्वी शॉने (Pruthvi Shaw) कमालीची खेळी करत आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. पृथ्वीने 41 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पृथ्वीच्या तुफानी खेळीमुळे दिल्लीने (DC) केकेआरला (KKR) ७ गडी राखून हरवले. पृथ्वीला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात देखील आले. या खेळी दरम्यान शॉने आपल्या नावावर एक विक्रम देखील केला. शिवम मावीच्या पहिल्या षटकात पृथ्वीने 6 चेंडूत 6 चौकार लगावले. पृथ्वी आयपीएल (IPL) इतिहासातील दुसराच असा फलंदाज आहे ज्याने 6 चेंडूत 6 चौकार मारले आहेत. या अगोदर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 2012 मध्ये आरसीबीच्या विरुद्ध 6 चेंडूत 6 चौकार मारले होते. भलेही  पृथ्वी शॉ आणि शिवम मावी एकदुसऱ्याच्या विरोधात खेळले असतील परंतू ते दोघे मैदाना बाहेर खूप चांगले मित्र आहेत. (IPL 2021: After Prithvi hit 6 fours in 6 balls, Shivam Mavi took revenge)

पृथ्वीने 6 चौकार मारले खरे पण शिवम मावी आणि पृथ्वी सामान्यनंतर मजाक करताना दिसले. सामन्यानंतर शिवम आणि पृथ्वी यांच्यात बातचीत झाली त्यावेळी शिवमने पृथ्वीला गळाभेट दिली आणि मजाक केला. आयपीलच्या ट्विटर हॅन्डलवरती (Twitter) हा व्हिडिओ शेर केला आहे. सोशिअल मीडियावरती व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्याच्या पहिल्याच षटकात 6 चौकार मारणारा पृथ्वी आयपीएल इतिहासातील एकमेव असा फलंदाज आहे. पृथ्वीने या सामन्यात 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पृथ्वीने ,यंदाच्या हंगामातील दीपक हुडाचा 20 चेंडूत अर्धशतक केल्याचा विक्रम मोडीत काढला आहे. 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यांनतर पृथ्वी 82 धावा करून बाद झाला.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com