IPL 2021: मॉर्गन सोबत झालेला वादावर अश्विनचा मोठा खुलासा

मॉर्गनने अश्विनच्या खिलाडूवृत्तीबद्दल व्यक्त केली होती चिंता
IPL 2021: R Ashwin and Eoin Morgan
IPL 2021: R Ashwin and Eoin MorganDainik Gomantak

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा ऑफस्पिनर आर अश्विनने (R Ashwin) इऑन मॉर्गन (Eoin Morgan) सोबतचा झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना अय प्रकरण संपले असल्याचे सांगितले आहे करून हे संपवण्याचा प्रयत्न केला. अश्विनने केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनसोबत झालेला वादावर पडदा टाकताना, ही आमचे वैक्तिगत लढाई नसून खेळ भावनेविषयी मतभेद असल्याचे जाहीर केले. मागच्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि नाईट रायडर्स (KKR) संघांत झालेल्या आयपीएलच्या लीग सामन्यादरम्यान, वृषभ पंतला (Rishabh PAnt) चेंडू लागल्यानंतर अश्विनने एक रन घेण्याचा प्रयत्न केला आणि निघून गेला. यानंतर मॉर्गनने त्याच्या खिलाडूवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

IPL 2021: R Ashwin and Eoin Morgan
प्रतिभावान खेळाडू नसल्यानेच भारत पाकिस्तानशी खेळत नाही: अब्दुल रज्जाक

चेन्नई विरुद्धचा सामना झाल्यानंतर अश्विन प्रतिक्रिया देताना म्हणाला 'मला वाटते ही वैयक्तिक लढाई नसून, मी त्या गोष्टीकडे तश्या नजरेने बघत नाही, ज्या लोकांना त्या विषयावर जास्त ध्यान द्यावेसे वाटते ती त्यांची मर्जी, पण आपल्याला असे काही वाटत नाही.' अश्विन म्हणाला की त्याला माहित नव्हते की चेंडू वृषभ पंतला लागला होता. मॉर्गनला वाटले की असेल कि मी त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देईन म्हणून त्यांनी तसे ठरवले असेल की ते मला लक्ष्य करण्याचे आणि पण मी वापरलेले शब्द योग्य नाहीत. सामन्यानंतर अश्विनने ट्विटरवर मॉर्गन आणि टीम साऊदीला "अपमानास्पद" शब्द वापरू नये आणि त्यांना "खेळ भावना" शिकवू नये असे सांगितले.

IPL 2021: R Ashwin and Eoin Morgan
IPL 2021: शिष्याचा गुरुला झटका; CSK चा परभव करत DC नं काबिज केलं अव्वल स्थान

त्यानंतर अश्विनने मॉर्गन आणि साउथीकडे जाऊन, दिनेश कार्तिकच्या साहाय्याने प्रकरणाला विराम दिला. अश्विन म्हणाला, 'सांस्कृतिकदृष्ट्या आपण प्रत्येकजण वेगळा आहे, इंग्लंड आणि भारतात क्रिकेट खेळण्याची आणि शिकवण्याची पद्धत वेगळी आहे' तो म्हणाला, 'मी असे म्हणत नाही की, कोणती पद्धत चुकीची किंवा बरोबर आहे. पण एक गोष्ट सत्य आहे ती म्हणजे 1940 च्या दशकात जे क्रिकेट खेळले जात होते, आज त्या पद्धतीने कोणी खेळेल अशी अपेक्षा कोण करू शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com