हा ठरला आयपीएल 2021च्या अंतिम लिलाव यादीतला सर्वात तरूण खेळाडू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

बीसीसीआयने गुरुवारी रात्री आयपीएल 2021 च्या अंतिम लिलावात समावेश असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

मुंबई : बीसीसीआयने गुरुवारी रात्री आयपीएल 2021 च्या अंतिम लिलावात समावेश असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. 16 वर्षीय अफगाणिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद हा आयपीएल 2021 च्या अंतिम लिलावात समाविष्ट असलेला सर्वात तरूण खेळाडू आहे, तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचा मुलगा 41 वर्षांचा असलेला नयन दोशी हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

'कमबॅक' करणं हा टीम इंडियाचा इतिहास; इंग्लंड टीमला घरचा आहेर

चेन्नईत 18 फेब्रुवारीला होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 (आयपीएल) लिलावासाठी ज्येष्ठ फिरकीपटू हरभजन सिंग आणि मध्यमगती फलंदाज केदार जाधव यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांना दोन कोटींच्या बेस प्राइजअंतर्गत स्थान देण्यात आले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने खेळाडूंची संख्या कमी केली असून,एकूण 292 खेळाडू लिलावात प्रवेश करतील. एकूण आठ फ्रेंचायझी बोली लावतील. लिलाव यादीत 144 भारतीय, 122 परदेशी आणि सहयोगी देशांतील 3 खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

"विराट कोहलीच्या कॅप्टन्सीबद्दल होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही"

 भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलच्या वरच्या स्थानी पोहोचला आहे. सामन्याआधी तो चौथ्या क्रमांकावर होता. या सामन्याआधी अव्वल स्थानावर असलेला भारत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. दुसरा कसोटी सामना 13 फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरही खेळवला जाईल. दुसर्‍या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे माघार देण्यात आली आहे, त्यामुळे दुसऱ्या कसोटीआधी इंग्लंडला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या