IPL 2021 Auction : घरात टीव्ही नव्हता, आता तोच ट्वीव्हीवर खेळताना दिसणार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

 22 वर्षीय खेळाडू चेतन सकारीयाची आयपीएलच्या 14 व्या सीजनमध्य़े निवड झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमीअर लिगच्या (आयपीएल) 14 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएल क्रिकेटला भारतील अनेक उदयोन्मुख खेळाडू क्रिकेट क्षेत्रातील एक नवी संधी म्हणून पाहतात. आयपीएल क्रिकेट मधून अनेक खेळाडूंनी क्रिकेट कौशल्यांच्या जोरावर या क्षेत्रात मोठी प्रसिध्दीही प्राप्त केली आहे. आताही असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आपली खिलाडूवृत्ती साधत आयपीएल सारख्या लीगमध्ये सहभागी होऊन क्रिकेट कौशल्य़ांचा आदर्श निर्माण केला आहे. असाच एक 22 वर्षीय खेळाडू चेतन सकारीयाची यावर्षी होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या सीजनमध्य़े निवड झाली आहे.

चेतन सकारीया हा गुजरातमधील भावनगर जिल्ह्यामधून येतो. यावर्षी 14 आयपीएल सीजनसाठी चेन्नईमध्ये पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत चेतनला राजस्थान रॉयल्सने 1.02 कोटी देवून त्याचा आपल्या संघात समावेश करुन घेतला आहे. चेतनची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. चेतनची घरची परिस्थिती अगदी सुमार आहे. त्याच्या घरी गेल्या वर्षी पर्यंत टीव्हीसुध्दा नव्हता. चेतनची मॅच बघण्यासाठी त्याच्या घरची मंडळी शेजाऱ्यांच्या घरी जात असत.चेतनने आपल्या क्रिकेटची सुरुवात सौराष्ट्र टीमकडून केली आहे. चेतनने आत्तापर्यंत सौराष्ट्र टीमकडून 15 फस्ट क्लास मॅचेस खेळला याच्यामध्ये त्याच्या नावावर 41  विकेट पटकावण्याचा बहुमानही आहे. त्याचा एका सामन्यातील बेस्ट 63 धावामध्ये 6 विकेट राहिला आहे.

अर्जुनच्या 'मुंबई इंडियन्स' प्रवेशावर बहिण सारा तेंडूलकरने दिली...

चेतनने सध्या पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकमध्ये 5 सामन्यामध्ये 12 विकेट पटकावल्या आहेत. तर दुसरीकडे कूचबिहार करंडक स्पर्धेत त्याचे प्रदर्शन उत्तम राहिले आहे.चेतनने एमआरएफ पेस अकादमीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे मार्गदर्शन मिळवले आहे. चेतन आयपीएलच्या 14 व्या हंगामात राजस्थान संघाकडून खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅंमसन आहे.त्यामुळे चेतनला  संघातील अनेक दिग्गज खेळाडूंचे मार्गदर्शनही प्राप्त होईल.  

 

 

संबंधित बातम्या