IPL 2021: RCB ला मोठा झटका; स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार 

IPL 2021: RCB ला मोठा झटका; स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार 
IPL 2021 Big blow to RCB Star player withdraws from competition

मुंबई : इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) 14 व्या हंगामाची सुरुवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. मात्र विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार खेळाडू आणि यष्टीरक्षक जोश फिलिप याने आयपीएलमधून माघार घेतली. यासंबंधीची माहिती रॉयल चॅलंजेर्सने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिप याने वैयक्तिक कारणासाठी आपण आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे आता जोश फिलिपच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलन याला संघात स्थान दिले आहे.

जोश फिलिप य़ाने आयपीएलच्या 13 व्या हंगामात आरसीबीकडून पदार्पण केलं होतं. त्याने सलामीला येत 5 सामन्यामध्ये 78 धावा केल्या होत्या. मात्र त्याने यंदाच्या आयपीएल हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे आयपीएल लिलावामध्ये 21 वर्षीय एलनवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. त्याची बेस प्राइस 20 लाख रुपये होती.

मात्र आता जोश फिलिपने आरसीबीमधून माघार घेतल्यानंतर फिन ला आरसीबीकडून या आयपीएलच्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली आहे. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघातून अद्याप फिनने पदार्पण केलेले नाही, परंतु त्याने न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेतून अलिकडेच शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने 11 सामन्यामध्ये 56.88 च्या सरासरीने आणि 133 च्या स्ट्राइक रेटने 512 धावा काढल्या होत्या.  


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com