IPL 2021: ''हे '' 5 विक्रम यंदाच्या आयपीएल हंगामात मोडू शकतात?

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

कोरोना साथीमुळे आयपीएल 2021 चे सामने प्रेक्षक पाहण्यास स्टेडियममध्ये जाऊ शकले नाहीत.

कोरोना साथीमुळे आयपीएल 2021 चे सामने प्रेक्षक स्टेडियममध्ये पाहण्यास जाऊ शकले नाहीत. पण ते घरूनच आयपीएलचा (IPL 2021) आनंद लुटत आहेत. या हंगामात आतापर्यंत बरेच मोठे विक्रम झाले आहेत. त्याचबरोबर काही मोठे विक्रम तुटले देखील आहेत. हा हंगाम सध्या दुसर्‍या टप्प्यात पोहोचला आहे. आगामी सामन्यांमध्ये कोणते मोठे विक्रम बनवले जाऊ शकतात आणि कोणते मोठे विक्रम मोडले जाऊ शकतात याची माहिती घेऊयात. (IPL 2021: Can these "5" records be broken in this year's IPL season?)  

पांड्या बंधूंकडून कोरोनाकाळात मोठी मदत; क्रिकेट जगताकडून मदतीचा ओघ सुरूच 

ख्रिस गेल
पंजाब किंग्सचा (PBKS) जबरदस्त फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) 5000 धावांच्या जवळ पोहोचला आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 140 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 40.24 च्या सरासरीने 4,950 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 149.45 आहे. 41 वर्षीय ख्रिस गेल या 5,000 धावा पूर्ण करण्यापासून अवघ्या 50 धावा दूर आहे. या हंगामात तो 5000 धावा पूर्ण करू शकतो. 

अमित मिश्रा
या हंगामात दिल्ली कॅपिटलचा (Delhi Capitals) स्टार स्पिनर अमित मिश्राने आणखी 4 बळी घेतले तर तो लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) आयपीएलच्या सर्वाधिक बळींचा विक्रम मोडेल. अमितने आतापर्यंत 144 सामन्यात 166 बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर मलिंगाने 122 सामन्यात 170 बळी घेतले आहेत.

भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar)
सनरायझर्स हैदराबादचा (SRH) स्टार गोलंदाज आयपीएलमध्ये 150 विकेट घेण्यापासून 11 विकेट दूर आहे. या हंगामात त्याने हा पराक्रम केला तर आयपीएलमध्ये दीडशे विकेट्स घेणारा तो सहावा गोलंदाज होईल.

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादने केला मध्यातच मोठा बदल जाणून घ्या

एबी डिव्हिलिअर्स (ABD)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) या दिग्गज फलंदाजाने नुकत्याच आपल्या 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. या मोसमात त्याने आणखी 5 षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये आपले 250 षटकार पूर्ण करेल. ख्रिस गेलनंतर तो सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. गेलच्या नावावर 357 षटकार आहेत.

ख्रिस मॉरीस 
राजस्थान रॉयल्सच्या (RR) अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 94 विकेट नोंदवल्या आहेत. या मोसमात मॉरिसने (Chris Morris) 6 बळी घेतले तर त्याचे नावे 100 गाडी बाद करण्याचा विक्रम होईल.

संबंधित बातम्या