IPL 2021: हाऊ इज जोश? धोनीचा 'एक-हाती' षटकार पाहून रैनाही झाला अवाक!

गोमंत्नक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

आयपीएलची सुरुवात येत्या 9 एप्रिलपासून होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात खेळला जाणार आहे.

IPL 2021: आयपीएलची सुरुवात येत्या 9 एप्रिलपासून होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात खेळला जाणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने जोरदार प्रॅक्टीस करायला सुरवात केली आहे. एमएस धोनी मैदानावर चौकार आणि षटकार ठोकताना दिसला. त्याने त्याचा ट्रेलर नेटवर शेअर केला आहे. महेंद्रसिंग धोनीने एका हाताने आश्चर्यकारक षटकार ठोकला आणि सुरेश रैना एकदम आश्चर्यचकीत झाला. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बहुचर्चित इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे
 
चेन्नई सुपर किंग्जने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी एमएस धोनीला फलंदाजी करताना दाखवले आहे. धोनी प्रॅक्टीस करतांना नेटवर जोरदार फटके मारतांना दिसत आहे. सुरेश रैना त्याच्या मागे उभा आहे. धोनीने समोरच्या दिशेने जोरदार षटकार ठोकताच सुरेश रैना पहातच राहिला. सॅम करणनेही एक अप्रतिम प्रतिक्रिया या शटकारावर दिली.

आयपीएल 2020मध्ये धोनीने 14 सामन्यांत केवळ 200 धावा केल्या होत्या ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर 47 धावा होता. आयपीएलच्या 13 व्या हंगामात सीएसके संघ 7 व्या स्थानावर होता. यावेळी सीएसके 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल विरुद्ध खेळून आपल्या खेळाला सुरवात करणार आहे. यावेळी वृषभ पंत दिल्लीचा कर्णधार असणार आहे. त्यामुळे धोनी आणि पंतची कर्णधारी पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे.

संबंधित बातम्या