IPL 2021: CSK  मोठा झटका; आयपीएलमधून तिसऱ्या खेळाडूने घेतली माघार 

IPL 2021: CSK  मोठा झटका; आयपीएलमधून तिसऱ्या खेळाडूने घेतली माघार 
IPL 2021 CSK big blow Third player withdraws from IPL

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएल) 14 व्य़ा हंगामाची सुरुवात होण्यासाठी  9  दिवसांचा अवधी राहिला असताना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला (CSK)  मोठा झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जमधील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. हेझलवूडने या वर्षी होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस मालिकेचा विचार करुन त्याने माघार घेतली असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय बायो बबलमधून बाहेर पडून आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवायचा, असे त्याने सांगितले.

''बायो बबल आणि सतत क्वॉरंटाइन राहून 10 महिने झाले आहेत. त्यामुळे काही दिवस क्रिकेटमधून विश्रांती घेवून कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे,'' असं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटला बोलताना सांगितले आहे. ‘’पुढे  हिवाळ्यामध्ये आम्हाला खूप क्रिकेट खेळायचा आहे. वेस्ट इंडिजचा मोठा दौरा आहे, त्यानंतर बांग्लादेश दौरा, टी-ट्वेन्टी वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस मालिका. त्यामुळे पुढचे बारा महिने आम्ही व्यस्त असणार आहे. अशातच स्वत:ला शारिरीक आणि मानसिकरित्या तंदुंरुस्त ठेवण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे आयपीएलच्या 14 व्य़ा हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असं तो म्हणाला. (IPL 2021 CSK big blow Third player withdraws from IPL)

यंदाच्या 14 व्या आयपीएलमधून माघार घेणारा हेझलवूड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. यापूर्वी रॉय़ल चॅलेंजर्स बंगळूरु संघातून जोश फिलिप आणि सनरायझर्स हैदराबाद संघातून मिशेल मार्श यानेही माघार घेतली होती. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरोधात रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच हेझलवूडने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल सुरु होण्याच्या पूर्वसंधीवर हेझलवूडसाठी योग्य पर्याय निवडण्याचं मोठं आव्हान चेन्नईच्या संघासमोर असणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com