IPL 2021 : 'मला न सांगताच काढले', डेव्हिड वॉर्नर भावूक
IPL 2021: David Warner statement on team SRHDainik Gomantak

IPL 2021 : 'मला न सांगताच काढले', डेव्हिड वॉर्नर भावूक

सनरायझर्स हैदराबाद (SRH) व्यवस्थापनाने त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण स्पष्ट केले नाही. असे डेव्हिड वॉर्नरने सांगितले आहे (IPL2021)

IPL 2021 च्या दुसऱ्या फेजमध्ये अनेक खेळाडू न खेळताना दिसले आणि अनेकांना प्रश्न असेच पडत होते की 'या टीममध्ये हा खेळाडू का खेळात नाही 'त्यातच SRH चा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) हाही अनेक सामन्यात न खेळतानाच दिसला आणि तो का खेळला नाही हे स्पष्टीकरण त्याने आता दिले आहे आणि त्याचे हे स्पष्टीकरण सर्वांच्या भुवया उंचावत आहेत. (IPL 2021: David Warner statement on team SRH)

IPL 2021: David Warner statement on team SRH
विराटचं स्वप्न अधुरेच ! यंदाही RCB साठी IPL ट्राफी परकीच

सनरायझर्स हैदराबाद (SRH) व्यवस्थापनाने त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण स्पष्ट केले नाही. असे डेव्हिड वॉर्नरने सांगितले आहे. आयपीएलच्या सध्याच्या मोसमात सनरायझर्स फ्रँचायझीने त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचे कोणतेही कारण दिले नसल्याचा दावा या स्टार फलंदाजाने केला आहे. तो म्हणाला की फॉर्मच्या आधारावर निर्णय घेण्यात आला तर निराशाजनक आहे.कारण माझा खेळ या अगोदर चांगला होता मात्र भविष्यातही सनरायझर्सकडून खेळायला आवडेल असे त्याने सांगितले.

आयपीएल च्या पहिल्या टप्प्यात वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला सनरायझर्सची कमान देण्यात आली. गेल्या काही सामन्यांमध्ये वॉर्नरला संघात देखील स्थान देण्यात आले नव्हते. पण कर्णधारपद बदलूनही सनरायझर्सच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. आयपीएल गुणतालिकेत संघ तळाशीच राहिला. त्याने 14 पैकी 11 सामने गमावले.वॉर्नर म्हणाला की त्याला सनरायझर्सकडून आणखी खेळायला आवडेल, पण ते त्याच्या हातात नाही. तो म्हणाला, 'सनरायझर्सकडून खेळताना मला आनंद झाला. मला परत येण्याची आशा आहे.

Related Stories

No stories found.