IPL 2021: धोनीनं CSK च्या चाहत्यांना दिलं सरप्राईज (VIDEO)

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आलं आहे.

इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज च्या जर्सीमध्ये बदल करण्यात आला आहे. तीनदा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण केलं आहे. 2008 पासून आयपीएलच्या हंगामास सुरुवात झाल्यापासून चेन्नईने पहिल्यांदाच आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे चेन्नईचे खेळाडू यंदा नवीन जर्सीत दिसणार आहेत. चेन्नईच्या नव्या जर्सीमध्ये भारतीय सशस्त्र दलाचा सन्मान म्हणून ‘कॅम्पोलॉज’ देखील आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये पिवळा रंग आहे. पण आता खांद्यावर भारतीय़ जवानांचा सन्मान म्हणून 'कॅम्पोलॉज' चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रेंचायझीच्या ‘लोगो’ वरती तीन स्टार आहेत. 2008, 2011, 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचा किताब जिंकला असल्याचे तीन स्टार आहेत. चेन्नईच्या नवीन जर्सीचे अनावरण करताना महेंद्रसिंग धोनीने एक व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली. (IPL 2021 Dhoni surprises CSK fans (VIDEO))

Ing Vs Eng: विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

''सशस्त्र दलाचा सन्मान आणि त्यांच्या नि:स्वार्थ भूमिकेबद्दल जागरुकता वाढण्याचा मार्ग अनेक दिवसांपासून आम्ही शोधत आहोत. हा कॅम्पोलॉज विशेष करून त्यांच्य़ासाठी आहे.. आणि तेच आपले खरे नायक आहेत,'' असं चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. विश्वनाथन यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान यंदाच्या आयपीएलची सुरुवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिलपासून होणार आहे. तर 30 मे रोजी फायनल सामना होणार आहे. गेल्या वर्षी आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं होतं. यंदा मात्र आयपीएलचं आयोजन भारतातचं करण्यात आलं आहे.

 

संबंधित बातम्या