IPL 2021: रसेलच्या अफलातून ‘शॉट’ मुळे दिनेश कार्तिक जमिनीवर कोसळला

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल जोरदार फंलदाजी करत असताना दिसत आहे.

मुंबई: इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएल) नव्या हंगामाची सुरुवात लवकरच होणार आहे. आयपीएलमधील पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅंलजेर्स बंगळूरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्याआधी सर्व संघ कसून सराव करत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा सरवादरम्यानचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल जोरदार फंलदाजी करत असताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आंद्रे रसेलसह नॉन-स्ट्राइक एंडवर दिनेश कार्तिक खेळताना दिसत आहे. रसेलने मारलेल्या एका धोकादायक शॉटमुळे दिनेश कार्तिक जमीनीवर कोसळला आसल्याचे पाहायला मिळत आहे. रसेलने मारलेल्या शॉटमुळे दिनेश कार्तिकला गंभीर इजा होऊ शकली असती. मात्र कार्तिक सावधपणे वेगाने बाजूला सरकला. केकेआरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
गेल्या मोसमामध्ये आंद्रे रसेल चांगली कामगिरी करु शकला नव्हता. तसेच दिनेश कार्तिकही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र यंदाच्या हंगामात केकेआरला या दोघांकडून खूप आपेक्षा आहेत. आयपीएल 2021 मध्ये केकेआरचा पहिला सामना 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुध्द होणार आहे. हैदराबादविरुध्दच्या पहिल्या सामन्यापूर्वी केकेआरचे सर्व खेळाडू सरावामध्ये गुंतले आहेत.  (IPL 2021 Dinesh Karthik falls to the ground due to Russells unbeaten shot)

IPL2021 : दिल्ली कॅपिटल्सनंतर विराट कोहलीच्या संघाला मोठा धक्का 

कोलकाता नाईट रायडर्स संघ-
ईऑन मॉर्गन (कर्णधार) दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट. गुरकिरत सिंह, आंद्रे रसेल, सुनिल नरेन, कुलदिप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिध्द कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजनसिंह, करुणा नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.

 

संबंधित बातम्या