IPL 2021: इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतल्याने फ्रँचायझी नाराज, BCCIला लिहिले पत्र

खेळाडूंना हे देखील समजून घ्यावे लागेल की आमच्यासाठीही अनेक आव्हाने आहेत. अशा प्रकारे, खेळाडूंनी शेवटच्या क्षणी नकार दिल्याने आमच्यासाठीही समस्या निर्माण होते.
IPL 2021: इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतल्याने फ्रँचायझी नाराज, BCCIला लिहिले पत्र
इंग्लंडच्या (England) तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी आयपीएलमधून (IPL) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे.

IPL 2021: आयपीएलमधून (IPL) इंग्लंडच्या (England) क्रिकेटपटूंनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे फ्रँचायझींनी (Franchise) बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहिलेले आहे. आयपीएला 10 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. विविध कारणांमुळे आधीच अडचणीत असलेल्या आयपीएलला, इंग्लंडच्या तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंडच्या (England) तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी आयपीएलमधून (IPL) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे.
ENG vs IND: पैसा आणि IPLसाठी पाचवा कसोटी सामना रद्द, मायकेल वॉनचा गंभीर आरोप

शनिवारी दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू ख्रिस वोक्स, एसआरएच संघाचा जॉनी बेअरस्टो आणि पंजाब किंग्जचा डेव्हिड मलान यांनी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयपीएल फ्रँचायझी खूप नाराज झाले आहेत. एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले, अशा प्रकारे खेळाडूंनी अंतिम क्षणी स्पर्धा सोडण्याचा निर्णय संघासाठी योग्य नाही. आम्ही या गोष्टीला कंटाळलो आहोत. यामुळे त्यांनी आता बीसीसीआयला याबाबत पत्रही लिहिले आहे.

आयपीएल फ्रँचायझीशी संबंधित एका अधिकाऱ्याने, इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतल्याने त्याचा फटका बसणार आहे. आम्ही इंग्लंड संघातील आमच्या खेळाडूला गुरुवारी खात्री केली होती की तो 15 सप्टेंबरला यूएईला पोहोचेल आणि दुसऱ्या टप्प्यात खेळेल. आयपीएल खेळाडूने त्याच्याबरोबर त्याच्या जोडीदाराची व्यवस्था करण्याची विनंती केली. आम्ही त्यांची आणि भागीदारांची व्यवस्था करण्यास सहमत झालो. शनिवारी खेळाडूने आम्हाला सांगितले की तो येणार नाही. हे न्याय्य नसून, अव्यवसायिक आहे. हे आमच्या कराराच्या विरोधात आहे. याबाबत आम्ही बीसीसीआयला पत्रही लिहिले आहे.

शनिवारी रात्री ही बातमी आली की इंग्लंड संघाचे 3 खेळाडू जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स आणि डेव्हिड मलान यांनी आयपीएल 2021 मधून माघार घेतली आहे. यापूर्वी इंग्लिश खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडू शकतात असे आम्ही सांगितले होते. यानंतर संघांनी या खेळाडूंच्या बदलीची घोषणाही केली.

इंग्लंडच्या (England) तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी आयपीएलमधून (IPL) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे.
IND vs ENG: BCCI आणि ECB यांच्यातील वादानंतर सामना रद्द!

एका अधिकाऱ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले, हा काळ सर्वात जास्त कठीण आहे. खेळाडू सतत बायो बबलमध्ये असतात, मानसिक थकवा जाणवतो. आम्ही हे पूर्णपणे समजतो, आणि त्याच्याबद्दल सहानुभूती ही व्यक्त करतो. पण खेळाडूंना हे देखील समजून घ्यावे लागेल की आमच्यासाठीही अनेक आव्हाने आहेत. अशा प्रकारे, खेळाडूंनी शेवटच्या क्षणी नकार दिल्याने आमच्यासाठीही समस्या निर्माण होते.

वगळलेल्या खेळाडूंची बदली

आयपीएल फ्रँचायझींनी इंग्लंडमधील खेळाडूंच्या जागी येणाऱ्या खेळाडूंची निवड केली आहे. पंजाब किंग्ज संघाने डेव्हिड मलानच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करामचा समावेश केला आहे. सनरायझर्स हैदराबादने बेअरस्टोच्या जागी विंडीजचा अष्टपैलू शेरफेन रदरफोर्डचा समावेश केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com