IPL 2021: कोलकत्याचा 'विजयी रथ'; मुंबईला हरवत चौथ्या स्थानावर

IPL 2021 हंगामाचा दुसरा भागात कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) साठी जबरदस्त सुरूवात झाली आहे.
IPL 2021: KKR beat MI by 7 wickets now Kolkata on 4th position in point table
IPL 2021: KKR beat MI by 7 wickets now Kolkata on 4th position in point table Twitter @IPL

IPL 2021 हंगामाचा दुसरा भागात कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) साठी जबरदस्त सुरूवात झाली आहे. UAE मध्ये सलग दोन्ही सामने जिंकून KKR ने गुणतालिकेत उडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात कोलकत्त्याने बेंगलोर (RCB) चा पराभव केल्यांनतर कालच्या मॅचमध्ये मुंबईला (MI) धूळ चारत पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर उसळी घेतली आहे (MIvsKKR). अबू धाबी येथे झालेल्या सामन्यात कोलकात्याने मुंबईकडून 156 धावांचे लक्ष्य अवघ्या 15.1 षटकांत पूर्ण केले करता सामना आपल्या नावावर केला. डावाच्या पहिल्याच षटकापासून शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी रानांचा मारा सुरू केला आणि हाच मारा राहुल त्रिपाठीने विजयापर्यंत सुरू ठेवला. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि त्रिपाठी (Rahul Tripathi) यांनी अर्धशतके झळकावत मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांना नामोहरण केले. (IPL 2021: KKR beat MI by 7 wickets now Kolkata on 4th position in point table)

केकेआरचा या मोसमात 9 सामन्यांमधील हा चौथा विजय असून या स्वॅशबकलिंग विजयामुळे टीमच्या रन रेटला जबरदस्त फायदा झाला आहे आणि KKR 8 गुणांसह मुंबईला हरवत चौथ्या स्थानावर पोहोचचा आहे. त्याचवेळी, मुंबई चौथ्यावरून सहाव्या क्रमांकावर घसरली आहे . राजस्थान रॉयल्सचेही 8 गुण असून ते पाचव्या स्थानावर कायम आहेत.

IPL 2021: KKR beat MI by 7 wickets now Kolkata on 4th position in point table
IPL 2021: हैदराबादला मोठा झटका, 'या' खेळाडूने आयपीएल सोडण्याचा घेतला निर्णय

आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सुद्धा शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी दणकेबाज फलंदाजी केली होती. तीच कामगिरी दोन्ही फलंदाजांनी या सामन्यातही अशीच सुरू ठेवली. तही अशीच सुरू ठेवली. पहिल्याच षटकात गिल आणि अय्यरने बोल्टवर दोन षटकार ठोकत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 3 षटकांत 40 धावा दिल्या. गिल बाद झाल्यानंतरही हल्ला थांबला नाही आणि अय्यरला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राहुल त्रिपाठीनेही तेच केले. मुंबईच्या साऱ्याच गोलंदाजांना या दोघांनी जोरदार प्रहार करत लक्ष केलं आणि या दोघांनी 88 धावांची भागीदारी केली.

तर दुसरीकडे केकेआरच्या गोलंदाजांनीही कमालीचा मारा करत मुंबईला अवघ्या 155 धावावर रोखल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com