IPL 2021: CSK च्या जर्सीसाठी 15 बाटल्याचा वापर; जाणून घ्या कारण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

नव्या जर्सीमध्ये उत्तमप्रतीच्या  पॉलिस्टरचा वापर करण्यात आला असून इतरांपेक्षा 90 टक्के कमी पाणी शोषून घेते.

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगची (आयपीएल) सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या पर्वासाठी आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. 2008 मध्ये आयपीएलला सुरुवात झाल्यापासून चेन्नई संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. या नव्या जर्सीमध्ये भारतीय सशास्त्र दलाचा सन्मान म्हणून कॅम्पोलॉज देखील आहे. विशेष म्हणजे ही नवी जर्सी पर्यावरणाला समोर ठेवून बनवण्यात आली असून जर्सीसाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. या जर्सीबद्दल फ्रेंचायझीने माहिती दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या एक रेप्लिका जर्सी बनवण्यासाठी 15 प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करुन वापरल्या गेल्या आहेत. तसेच या नव्या जर्सीमध्ये    उत्तमप्रतीच्या  पॉलिस्टरचा वापर करण्यात आला असून इतरांपेक्षा 90 टक्के कमी पाणी शोषून घेते. चेन्नई सुपर किंग्ज आत्तापर्यंत दहा वेळा आयपीएलमध्य़े प्लेऑफमध्ये पोहचला होता. तेथे चेन्नईच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. (IPL 2021 Learn to use 15 bottles for CSK jersey because)

ऐकावं ते नवलच! टी-20 च्या इतिहासात पहिल्यादांच घडलं असं

चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणे पिवळा आहे, पंरतु खांद्यावर भारतीय जवानांचा सन्मान म्हणून आर्मीचा कॅमोप्लॉजचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रेंचायझीच्या लोगो च्या वरती तीन स्टार आहेत 2010, 2011, 2018 मध्य़े चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला होता. नव्या जर्सीचे अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ शेअर याबाबत माहिती देण्यात आली होती.

9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. तर शेवटचा अंतिम सामना 30 मे रोजी खेळवण्यात य़ेणार आहे. गेल्या वर्षी आयपीएलचे आयोजन युएईमदध्ये करण्यात आले होते. परंतु यंदा पुन्हा एकदा आयपीएलचे आयोजन भारतात करण्यात आले आहे.

 

संबंधित बातम्या