माहीच्या 'फिनिशने' लिटल फॅन भावुक, धोनीने दिले अनोखे गिफ्ट

IPL 2021 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये, MS Dhoni त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला.
माहीच्या 'फिनिशने' लिटल फॅन भावुक, धोनीने दिले अनोखे  गिफ्ट
IPL 2021: MS Dhoni finish math in his style Mahi's little fan celebration goes viralDainik Gomantak

सर्वांचा आवडता माही (Mahi) म्हणजेच आपला धोनी (MS Dhoni) हा नेहमीच आपल्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असतो,त्याचबरोबर धोनी हा नेहमी आपल्या चाहत्यांसाठीदेखील काहीतरी सरप्राइज देत असतो आणि या मुळे त्याला मोठा मनाचा खेळाडू देखील म्हणतात.आणि आता एमएस धोनीने पुन्हा एकदा चाहत्यांना दाखवून दिले की तो जगातील सर्वात आवडता क्रिकेटपटू का आहे. रविवारी दुबईमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयी धावांनि शेवट केल्यावर, धोनीने एका चाहत्याला मॅच CSK ने जिंकेलला चेंडू भेट दिला आहे. (IPL 2021: IPL 2021: MS Dhoni finish math in his style Mahi's little fan celebration goes viral)

IPL 2021 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये, एमएस धोनी त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला. क्रिकेट चाहते माहीच्या या अवताराची आतुरतेने वाट पाहत होते. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने विजयी फटका मारून आपल्या संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले.एकेवेळी या सामन्यात CSKची अवस्था पाहून CSK सामना हरणार अस सर्वांना वाटत होते पण एमएस धोनीने अशक्य शक्य करून दाखवले आणि चेन्नई सुपर किंग्जला एक चौकार मारून अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

माहीच्या या तुफानी फटकेबाजीने सर्वांनाच आनंद दिला जेव्हा एमएस धोनी मैदानात चौकार आणि षटकार मारत होता, तेव्हा एक लहान मुलगी स्टेडियमच्या स्टँडमध्ये खूप भावूक झाली, तिने चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातली होती. 'यलो आर्मी' जिंकताना पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहते म्हणाले- 'धोनी हे नाव नसून इमोशन आहे .'

IPL 2021: MS Dhoni finish math in his style Mahi's little fan celebration goes viral
T20 WC: शोएब मलिकची पाकिस्तान टीम मध्ये एन्ट्री

त्या चिमुकल्या फॅनला धोनीने सामन्यानंतर आपला स्वाक्षरी केलेला चेंडू भेट दिला. CSK च्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतर धोनीने चाहत्यांचे आणि सपोर्ट स्टाफचे आभार देखील मानले आहे. धोनी म्हणाला की, गेल्या वेळी आम्ही पात्र ठरलो नाही, हे खूप कठीण होते. प्रत्येकजण खूप भावनिक होता.

Related Stories

No stories found.