IPL 2021: धोनीच्या नव्या लुकमूळे सोशल मिडीयावर व्हायरल होतोय प्रोमो

MS Dhoni: या व्हिडिओमध्ये धोनीने भन्नाट ड्रेसिंग केलेला दिसुन आला असुन त्याने आपले केस वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेले दिसता आहेत.
IPL 2021 Promo
IPL 2021 PromoDainik Gomantak

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्सचे (MI) संघ युएईमध्ये पोहोचले आहेत. चेन्नईने यूएईमध्ये प्रशिक्षणही सुद्धा सुरु केली असुन कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) नेटमध्ये प्रचंड घाम गाळताना दिसतो आहे. त्यातच धोनीचा एक व्हिडिओ समोर आला असुन हा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात वादळ येत आहे, अस तो या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो आहे.

इंडियन प्रीमियर लीगने नुकताच आयपीएल 2021 चा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नव्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये धोनीने भन्नाट ड्रेसिंग केलेला दिसुन आला आहे. धोनीने आपले केस वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेले दिसता आहेत. धोनीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

" मेहरबान-साहेबान, आयपीएल के कदरदान. बच्चा पहलवान. इंटरवेल के बाद आएगा दूसरे हाफ का तूफान. ड्रामा है, सस्पेंस है क्लाइमैक्स है. गब्बर है, हिटमॅन है, हेलीकॉप्टर का टेकऑफ है. किंग है, प्लेऑफ है, सुपरओव्हर है. पहला हाफ तो सिर्फ झांकी है, आयपीएल के दूसरे हाफ का असली पिक्चर बाकी है.”असे म्हणत महेंद्रसिंग धोनीने या व्हिडीओच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढवली आहे.

IPL 2021 Promo
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्सने जिंकली आयुष्याची लढाई

आयपीएल 2021 स्पर्धा 9 एप्रिल रोजी सुरू झाली होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली. खेळाडूंना एकामागुन एक संसर्ग झाला आणि बीसीसीआयला स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वीच कोरोनावर सावली होती. मात्र, बायो-बबलच्या सहय्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com