IPL 2021: राजस्थान रॉयल्सने शाही थाटात लॉन्च केली नवी जर्सी (VIDEO) 

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

राजस्थान रॉयल्सने 3D प्रोजेक्शनद्वारे नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.

इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) 14 व्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. ही स्पर्धा भारतीयांसाठी उत्सवासारखी असते. आयपीएलच्या महोत्सवाची भारतीय लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएल स्पर्धा ही भारताबरोबर जगात सर्वाधिक लोकप्रिय असणारी क्रिकेट लीग आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. आयपीएलच्या या नव्या पर्वात चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स यांनी आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. आता आणखी एका संघाने आपली नवी जर्सी समोर आणली आहे.

आयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये राजस्थान रॉयल्स संघ विजेता ठरला होता. या हंगामात राजस्थान रॉयल्सने 3D प्रोजेक्शनद्वारे नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. राजस्थान संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ही जर्सी समोर आणली आहे. राजस्थान रॉयल संघाने 2008 मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर राजस्थान संघांची कामगिरी फारशी खास राहिली नाही. मागच्या वर्षी राजस्थान संघाने भन्नाट सुरुवात केल्यानंतरही स्पर्धेच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी करु शकला नाही. या पर्वामधील राजस्थान रॉयल संघाचा पहिला सामना 12 एप्रिल रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे. या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने संजू सॅमसनला कर्णधार केले आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची निवड या मोसमामध्ये संघाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. (IPL 2021 Rajasthan Royals launch new jersey in royal style VIDEO)

RSAvsPAK : चुकीला माफी नाही; झमानला फसवणं आफ्रिकेला महागात पडलं

2021 च्या आयपीएल लिलावासाठी राजस्थान रॉयल्सने सर्वात महागडी बोली लावली आहे. दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक आणि अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला 16.25 कोटींची बोली लावली आहे. शिवाय संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सांमने खेळणार नाही. त्यामुळे बांग्लादेशच्या मुस्तफिजूरला मॉरिसची साथ मिळणार आहे.

राजस्थान रॉयल संघ-

संजू सॅमसन (कर्णधार), जोफ्रा आर्चर, बेन स्टोक, जोस बटलर, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, जयदेव उलाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकारिया, केसी करिप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदिप यादव, आकाश सिंह. 
 

संबंधित बातम्या