IPL 2021: RCB चा प्लेऑफसाठी वॉर, तर PBKSची अस्तित्वासाठी झुंज

दोन संघांमधील प्रतिस्पर्धा अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे
IPL 2021: RCB चा प्लेऑफसाठी वॉर, तर PBKSची अस्तित्वासाठी झुंज
RCB Vs PKBS (IPL 2021)Tweeter / @IPL

IPL 2021च्या 14 व्या हंगामातील 48 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि पंजाब किंग्ज यांच्यात (PBKS) आता थोड्याच वेळात शारजाह मैदानावर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे, कारण विराट कोहलीच्या (Captain Virat Kohli) नेतृत्वाखालील RCBला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची नामी संधी आहे, तर केएल राहुलच्या (Captain KL Rahul) नेतृत्वाखालील PBKS संघाला जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहणे गरजेचे आहे.

RCB Vs PKBS (IPL 2021)
भारतीय महिलांचे वर्चस्व कायम

दोन संघांमधील प्रतिस्पर्धा अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. IPL चा इतिहास पाहता पातिस्पर्धी संघांमढील लढतीत 12 सामने बंगळुरू संघाने जिंकले आहेत, तर 15 सामन्यांमध्ये पंजाबने विजय मिळवला आहे. एवढेच नाही तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या संघाचा पराभव केलेला आहे, ज्यात एकाच सत्रात तसेच मागील हंगामातील दोन सामन्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत हा सामना उत्साहवर्धक होणार एवढे निश्चित.

Related Stories

No stories found.