IPL 2021: सिम्बाच्या गोलंदाजीवर राहणेची फटकेबाजी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

रणवीरने क्रिकेटच्या मैदानातील राहणेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

उद्यापासून इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) 14 व्या पर्वाची सुरुवात होणार आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह अत्यंत शिगेला पोहचला आहे. आयपीएलच्या मैदानात उतरुन आपला जलवा दाखवण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूला आणि टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आतुर झाले आहेत. यातच क्रिकेटचा शौक असणारे बॉलिवूड सेलिब्रेटीसुध्दा मागे राहीले नाहीत. आपल्या आवडीच्या टीमला आणि क्रिकेटपटूला प्रोत्साहन देण्यासाठी सेलिब्रेटी मैदानात उपस्थित राहत असताना आपण अनेकदा पाहील.

बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंहने देखील दिल्ली टीमचा विस्फोटक  फलंदाज अजिंक्य राहणेसोबतचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीरने क्रिकेटच्या मैदानातील राहणेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात रणवीरने लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला, ‘’ऑल द बेस्ट फॉर द टुर्नामेन्ट चॅम्प’’, असं म्हणत त्याने राहणेला 2021 च्या इंडियन प्रिमिअर लिगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अजिंक्यने देखील रणवीरचे आभार मानले आहेत. (IPL 2021 Simbas bowling to stay)

IPL2021 : मायकल जॅक्सनच्या गाण्यावर ख्रिस गेलचा अफलातून डान्स; पहा व्हिडिओ 

रणवीर सिंहने अजिंक्य राहणे सोबतचा फोटो शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच त्यांच्या फोटोला विशेष पसंती सुध्दा मिळत आहे. तर दुसरीकडे राहणेने रणवीर सोबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरील इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केला आहे. ‘’जब सिम्बा आया मेरी गली तो एक क्रिकेट शॉट तो बनता है’’,असं कॅप्शन अजिंक्यने या व्हिडिओला दिलं आहे.
 

संबंधित बातम्या