IPL 2021: पराभवानंतर विराट नाराज, असे खेळल्यास टॉपच्या संघांमध्ये राहणे होईल अवघड
चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) खूप निराश झाला आहे.Dainik Gomantak

IPL 2021: पराभवानंतर विराट नाराज, असे खेळल्यास टॉपच्या संघांमध्ये राहणे होईल अवघड

चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) खूप निराश झाला आहे. त्याने ड्रेसिंग रूममध्ये आरसीबीच्या (RCB) खेळाडूंशी चर्चा केली.

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) (Chennai Super Kings) काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (Royal Challengers Bangalore) सहा गडी राखून मात केली. या विजयासह महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) संघ 14 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला. दुसरीकडे, आरसीबीचा संघ 9 सामन्यांमध्ये 5 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) खूप निराश झाला आहे. त्याने ड्रेसिंग रूममध्ये आरसीबीच्या (RCB) खेळाडूंशी चर्चा केली.

चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) खूप निराश झाला आहे.
IPL 2021: हैदराबादला मोठा झटका, 'या' खेळाडूने आयपीएल सोडण्याचा घेतला निर्णय

धोनीने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार विराट कोहली (53) आणि युवा देवदत्त पडिक्कल (70) यांनी पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली, पण तरी सीएसके आरसीबीला 6 बाद 156 धावांवर रोखले. यानंतर, सीएसकेने 18.1 षटकांत 4 बाद 157 धावा करत आपली विजयी मालिका सुरू ठेवली. सीएसकेचा हा सातवा विजय होता.

चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) खूप निराश झाला आहे.
IPL 2021: आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं सावट हैदराबादचा टी. नटराजन पॉझिटिव्ह

कोहलीने आपल्या संघाला सांगितले की, सीएसकेविरुध्दची आमची ही कामगिरी फराच निराशाजनक होती. या पराभवामुळे आम्ही दुखावलो गेलो आहे. जर आम्हाला या IPL मध्ये टॉपच्या संघांमध्ये राहायचे असेल तर असे खेळून ते शक्य होणार नाही.

दुसरीकडे, मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून देखील पराभावाचा सामना करावा लागला. पण तरी देखील आरसीबी 10 गुणांसह गुणतालीकेत तिसऱ्या स्थानावर आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 38 तर फाफ डु प्लेसिसने 31 धावा केल्या. याशिवाय मोईन अलीने 18 चेंडूत 23, अंबाती रायडूने 22 चेंडूत 32 धावा केल्या. तर धोनी 11 आणि सुरेश रैनाने 17 धावांवर नाबाद राहिले. तत्पूर्वी, आरसीबीकडून देवदत्त पडिकलने 70 आणि कोहलीने 53 धावा केल्या.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com