IPL 2021: खेळाडू का जात आहेत आयपीएल सोडून?; जाणून घ्या कारण

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

भारतातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या सेफ बायो बबलनेही खेळाडूं प्रती चिंता व्यक्त केली आहे.

भारतातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या सेफ बायो बबलनेही खेळाडूं प्रती चिंता व्यक्त केली आहे.  अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन व्यतिरिक्त काही ऑस्ट्रेलियन खेळाडू लीगमधून बाहेर पडले आहेत. त्यानंतर, स्पर्धा मात्र सुरु राहील असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे . रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटलच्या अश्विन ट्विट करत म्हणाला "मी उद्यापासून सुरू होत असलेल्या या मोसमातील आयपीएलमधून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोरोना महामारीशी लढत आहे आणि या कठीण काळात त्यांना माझ्या मदतीची आवश्यकता आहे. जर गोष्टी पुन्हा ठीक झाल्या तर मी पुन्हा संघात येईन असे अश्विन पुढे म्हणाला. अश्विनने दिल्ली कॅपिटल्सचे आभार मानले . माहितीनुसार अश्विनच्या कुटुंबातील कोणी तरी सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. (IPL 2021: Why are players leaving the IPL)

IPL 2021: शोएब अख्तर म्हणतो....

ऑस्ट्रेलियन आणि राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायने भारतात कोरोना रुग्ण वाढल्याने भीती व्यक्त करत आयपीएलमधून बाहेर पडल्याचे सांगितले. आपल्या देशासाठी ऑस्ट्रेलियाचा  क्रिकेटपटू हा निर्णय घेऊ शकतात असा दावा त्यानी केला आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झांपा यांनीही वैयक्तिक कारणास्तव लीग सोडण्याचे ठरविले आहे. आयपीएलचे सामने नऊ शहरांमध्ये प्रेक्षकांशिवाय खेळले जात आहेत.  टाय अद्याप राजस्थान रॉयल्ससाठी एकही सामना खेळला नाही त्याला एक कोटी रुपयात विकत घेतला आहे. 

आयपीएल सोडून जाण्याची अनेक कारणे आहेत पण मुख्य कारण म्हणजे पर्थ येथे भारतातून परत जाणऱ्या लोकांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्याचे  प्रकार वाढले आहेत. पर्थ सरकार पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. बबलमध्ये राहण्याचा थकवा देखील एक कारण आहे असे टाय एका माध्यमाशी बोलताना म्हणाल आहे. पुढे टाय म्हणाला त्याला देशात प्रवेश मिळू नये त्यापूर्वीच मी निघून जाण्याचे ठरवले आहे.  बबलमध्ये बराच वेळ घालवणे खूप कंटाळवाणे आहे. ऑगस्टपासून, तो केवळ 11 दिवस बबल मधून बाहेर आहे आणि आता मला घरी जायचे आहे असे टाय म्हणाला. 

आयपीएल सुरूच राहील. जर कोणाला सोडायचे असेल तर त्याना काहीच हानी होणार नाही असे मत बिसिसिआयने व्यक्त केले आहे. झांम्पा आणि केन रिचर्डसन वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतत आहेत आणि उर्वरित सामने खेळणार नाहीत असे आरसीबीने निवेदनात म्हटले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्याच्याबरोबर पूर्णपणे आहे आणि शक्यतो प्रत्येक प्रकारे मदत करते आहे. लेगस्पिनर झांम्पाला  दीड कोटी आणि रिचर्डसनला चार कोटींमध्ये विकत घेण्यात आले होते. ब्रिटन, न्यूझीलंडसह अनेक देशांनी भारताच्या प्रवासावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियानेही उड्डाणांमध्ये 30 टक्क्यांनी कपात केली असून पुढे बंद होण्याची शक्यता आहे कारण गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज तीन लाख रुग्ण आढळत आहेत. ऑक्सिजन आणि काही आवश्यक औषधांच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणा संघर्ष करीत आहे. यापूर्वी, रॉयल्सचा लियाम लिव्हिंग्स्टोन देखील प्रवासी बंदी लागू होण्यापूर्वी युकेला परतला होता.

 

संबंधित बातम्या