IPL 2021: धोनीने नवी जर्सी लॉन्च करताच जडेजाने केली स्पेशल डिमांड 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

आयपीएलला सुरुवात झाल्यापासून महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने तीन वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे.

इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने जर्सीचे अनावरण करत असतानाचा धोनीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. या सगळ्यावर अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने एक मजेशीर रिप्लाय़ दिला आहे. आयपीएलला सुरुवात झाल्यापासून महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने तीन वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे.

आयपीएलला सुरुवात झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदाच जर्सीमध्ये बदल केला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्य़ा जर्सीचा रंग पिवळाच आहे मात्र खांद्यावर भारतीय लष्काराचा सन्मान म्हणून आर्मीच्या 'कॅम्पोलॉज' चा समावेश करण्यात आला आहे. फ्रेंचायझीच्या लोगोवर तीन स्टार आहेत. 2010,2011, 2018 मध्ये आयपीएलचा चेन्नईने किताब जिंकल्याचे ते तीन स्टार आहेत. ही जर्सी लॉंन्च करतानाचा एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने इनस्टाग्राम शेअर केला, त्यावर रविंद्र जडेजाने रिप्लाय देताना म्हटले की, ‘’माझ्यासाठी लार्ज जर्सी ठेवून द्या प्लिज,’’ अशा आशयाचे उत्तर जडेजाने दिले आहे. ‘’थेट मुंबईला जर्सीची डिलिव्हरी होईल, आम्हाला लवकर जॉईन करा’’ असा मजेशीर रिप्लायही सीएसकेने दिला आहे. (IPL 2021Jadeja makes special demand as soon as Dhoni launches New Jersey)

ICC T20 RANKING: के. एल. राहुलची घसरण; तर विराटची झेप

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जचा असलेला ट्रेनिंग कॅम्प चेन्नईतून आता मुंबईला हालवण्यात आला आहे. 26  मार्चपासून सीएसके ट्रेनिंग कॅम्पला सुरुवात करेल. मुंबईमध्येच त्यांचा यंदाच्या हंगामातील पहिला सामना होणार आहे.

 

संबंधित बातम्या