IPL 2022: मॅच पाहण्यासाठी आली मांजर, अंपायरने थांबवाला सामना

सामन्यादरम्यान एक मांजर स्टेडियममध्ये पोहोचले, आणि त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला.
IPL 2022: मॅच पाहण्यासाठी आली मांजर, अंपायरने थांबवाला सामना
IPL 2022Dainik Gomantak

आयपीएल 2022 (IPL 2022) दरम्यान अनेक मनोरंजक दृश्ये कॅमेरॉमध्ये कैद करण्यात आली आहेत. यासोबतच काही चाहते खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानावर पोहोचतात. नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले आहे. सामन्यादरम्यान एक मांजर स्टेडियममध्ये पोहोचले, आणि त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. (IPL 2022 A cat came to watch the match umpire stopped the match)

IPL 2022
कामरान अकमल उमरानच्या गोलंदाजीवर फिदा म्हणाला, "तर तो आता..."

सोशल मीडियावर सध्या (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये बंगळुरूच्या फलंदाजीदरम्यान स्टेडियममधील स्क्रीनवर एक काळी मांजर येऊन बसली होती. मांजराला पाहून अंपायरने काही काळ सामना थांबवला, आणि आरसीबीच्या डावात पहिल्या ओव्हरमधील फक्त 3 चेंडू झाले होते, जेव्हा अंपायरने मांजरीला पाहून सामना थांबवला. यावेळी फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली बॅटिंग करत होते. परत मांजर गेल्यानंतर सामना सुरू झाला.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूच्या खेळाडूंना केवळ 155 धावा करता आल्या. या सामन्यासाठी जॉनी बेअरस्टोला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून देखील गौरविण्यात आले, तर त्याने 29 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.