Man U, Formula 1 आता आयपीएलच्या मैदानात

मँचेस्टर युनायटेड (Manchester United) सारख्या मोठ्या फुटबॉल क्लबचे (Football club) मालक आणि फॉर्म्युला 1 (Formula 1) चे माजी मालकही आयपीएलचा (IPL) संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. 25 ऑक्टोबर रोजी दुबई मधूनच नवीन संघाच्या मालकांची नावे जाहीर करण्यात येणार आहे.
IPL नवीन संघाच्या मालकांची नावे 25 ऑक्टोबरला दुबई मधूनच जाहीर करणार
IPL नवीन संघाच्या मालकांची नावे 25 ऑक्टोबरला दुबई मधूनच जाहीर करणार Dainik Gomantak

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये 2022 पासून दोन नवीन संघ जोडले जाणार आहेत. म्हणजेच येणारी आयपीएल स्पर्धा एकूण 10 संघांमध्ये होणार आहे. मँचेस्टर युनायटेड (Manchester United) सारख्या मोठ्या फुटबॉल क्लबचे (Football club) मालक आणि फॉर्म्युला 1 (Formula 1) चे माजी मालकही आयपीएलचा संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. याशिवाय, भारतातील जिंदाल स्टील ग्रुपचे (Jindal Steel Group) नाव देखील समाविष्ट आहे. संघ खरेदीसाठी निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबरपर्यंत होती.

IPL नवीन संघाच्या मालकांची नावे 25 ऑक्टोबरला दुबई मधूनच जाहीर करणार
IPL 2022 10 संघमध्ये होणार, लवकरच जाहिर होणार दोन नवीन संघांची नावे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निविदेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट निश्चित केली होती. ही मुदत वाढवून 10 ऑक्टोबर करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्यांदा शेवटची तारीख 20 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. त्याचवेळी, अर्ज खरेदी करण्यासाठी फी 10 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती, जी परत केली जाणार नाही.

25 ऑक्टोबरला जाहीर होणार नवीन संघाच्या मालकांची नावे

25 ऑक्टोबर रोजी दुबई मधूनच नवीन संघाच्या मालकांची नावे जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी -20 विश्वचषकातील सामना होणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही तारीख 2 किंवा 3 दिवसांनी वाढविण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तूर्तास, आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट वेळापत्रकानुसार केली जात आहे.

IPL नवीन संघाच्या मालकांची नावे 25 ऑक्टोबरला दुबई मधूनच जाहीर करणार
IPL 2022 च्या लिलावातील पहिले 'रिटेन कार्ड' CSK धोनीसाठीच वापरणार

भारतीय क्रिकेट मंडळाने संघ खरेदी करण्यासाठी 2000 कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित केली आहे. त्यासाठी निविदाद्वारे पक्षांकडून बोली लावली जाणार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, 17-18 पक्षांनी निविदा काढल्या आहेत. नवीन संघ विकत घेण्याच्या शर्यतीतील काही प्रमुख मोठी नावे समोर आली आहेत. ती पुढील प्रमाणे...

Sanjeev Goenka – Promoters of RPSG
Glazer Family – Manchester United Owners
Adani Group promoters
Naveen Jindal – Jindal Power & Steel
Torrent Pharma
Ronnie Screwvala
Aurobindo Pharma
Kotak Group
CVC Partners
Singapore Based PE Firm
Hindustan Times Media
Broadcast & sports consulting agencies ITW,
Group M

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com