IPL 2022: विराट कोहलीच्या जागी 'हा' खेळाडू होणार RCB चा कर्णधार ?

डॅनियल व्हिटोरी म्हणाला, 'मला वाटते की आरसीबी (RCB) ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार म्हणून नियुक्त करु शकते.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

IPL 2022 च्या (IPL 2022) मेगा लिलावापूर्वी, RCB ने विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा समावेश असलेल्या 3 खेळाडूंना कायम ठेवले आहे. हा संघ आता मेगा लिलावात त्यांच्यासोबत काही दिग्गज खेळाडूंचा समावेश करणार आहे, परंतु त्याआधी प्रश्न आहे की, येत्या हंगामात संघाचा कर्णधार कोण असेल?

क्रिकइन्फोशी बोलताना डॅनियल व्हिटोरी म्हणाला, 'मला वाटते की आरसीबी ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार म्हणून नियुक्त करु शकते. हे एका हंगामासाठी देखील असू शकते, फक्त संघाची कामगिरी तपासण्यासाठी. गेल्या मोसमात मॅक्सवेलची कामगिरी अप्रतिम होती. मेलबर्न स्टार्सचा कर्णधार म्हणून त्याला चांगला अनुभव आहे.

Virat Kohli
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार? सौरव गांगुलीचे मोठे विधान

ग्लेन मॅक्सवेललाही कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले आहे. बिग बॅशमध्ये तो मेलबर्न स्टार्सचा कर्णधार आहे, ज्याने 62 पैकी 34 सामने जिंकले आहेत. संघ ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार बनवू शकतो, असा विश्वास आरसीबीचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी व्यक्त केला आहे. ज्याला फ्रँचायझीने 11 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. गेल्या मोसमात ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी केली आणि संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. ग्लेन मॅक्सवेलला कायम ठेवण्यासाठी येत्या हंगामात त्याला कर्णधारपद मिळेल अशी अटकळ बांधली जात आहे. कर्णधार बदलल्याने आरसीबीचे नशीब बदलेल आणि ते प्रथमच आयपीएल जिंकतील, अशी अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com