BCCI ची मोठी घोषणा, IPL 2022 भारतात होणार
IPL Dainik Gomantak

BCCI ची मोठी घोषणा, IPL 2022 भारतात होणार

आगामी आयपीएल स्पर्धा (IPL 2022) भारतात होणार असल्याची माहीती शुक्रवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.

आगामी आयपीएल स्पर्धा (IPL 2022) भारतात होणार असल्याची माहीती शुक्रवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. आयपीएल 2021 चा पहिला टप्पा भारतात आयोजित करण्यात आला होता, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो अर्ध्यातच थांबवावा लागला. नंतर तो सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये UAE मध्ये आयोजित करण्यात आला. यापूर्वी आयपीएल 2020 देखील यूएईमध्येच आयोजित करण्यात आले होते.

IPL 2022 साठी लवकरच मेगा लिलाव होणार आहे. पुढील वर्षीपासून या लीगमध्ये आठ ऐवजी 10 संघ सहभागी होणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवीन संघ पुढील मोसमापासून लीगमध्ये भाग घेणार आहेत. अशा स्थितीत जय शाह यांनी सांगितले की, आम्ही पुढील सीझनसाठी खूप उत्सुक आहोत. 10 संघांचा पुढील हंगाम चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे.

IPL
IPL 2022 बद्दल धोनीने केले मोठे वक्तव्य, खेळणार की नाही…

आयपीएल 2022 भारतात होणार आहे

टी-20 सामने भारतात परत होणार आहेत. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. या सामन्यांदरम्यान चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेव्हापासून पुढच्या वर्षी आयपीएल भारतातही होईल अशी अपेक्षा होती, आणि आता जय शाह यांनी यास दुजोरा दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या विशेष कार्यक्रमात जय शाह म्हणाले, 'मला माहित आहे की, तुम्हाला चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खेळ पहायचा आहे आणि आता लवकरच साध्य होणार आहे.' ते पुढे म्हणाले, 'आयपीएलचा 15वा हंगाम असणार आहे. भारतात आयोजित आणि दोन नवीन संघांच्या समावेश असणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com