Prithvi Shaw Vs Sapna Gill: पृथ्वी शॉसह 11 जणांना उच्च न्यायालयाची नोटीस, अडचणी वाढल्या

Prithvi Shaw Vs Sapna Gill: पृथ्वी शॉ सध्या आयपीएल 2023 मध्ये व्यस्त आहे. त्याचा संघ दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयाच्या शोधात आहे
Sapna Gill | Prithvi Shaw
Sapna Gill | Prithvi ShawDainik Gomantak

Prithvi Shaw Vs Sapna Gill: पृथ्वी शॉ सध्या आयपीएल 2023 मध्ये व्यस्त आहे. त्याचा संघ दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयाच्या शोधात आहे.

दिल्लीने सलग 4 सामने गमावले असून ते पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर पृथ्वी शॉही खराब फॉर्मशी झुंजत आहे. दरम्यान, पृथ्वी शॉविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे. सपना गिल प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नोटीस बजावली आहे.

खरे तर, फेब्रुवारीमध्ये शॉ आणि सपना गिलमध्ये सेल्फीवरुन वाद झाला होता. शॉने सपनावर बेसबॉलने हल्ला केल्याचा आणि 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सपना आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर सपनाने पृर्थी शॉ वर प्राणघातक शस्त्राने हल्ला आणि विनयभंग केल्याचा आरोप केला.

Sapna Gill | Prithvi Shaw
Prithvi Shaw - Sapna Gill: शॉच्या अडचणीत वाढ! जामीन मिळालेल्या सपनाकडूनही विनयभंगाची तक्रार दाखल

शॉ विरुद्ध नोटीस

सपनाने शॉविरुद्ध ओशिवरा पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी, सपनाने तिच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. सपनाच्या याचिकेवर पृथ्वी शॉ, त्याचा मित्र आणि काही पोलिस अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे.

Sapna Gill | Prithvi Shaw
Prithvi Shaw च्या कारवर हल्ला करण्याचा आरोप असलेल्या सपना गिलला अटक, वाचा नक्की प्रकरण काय

काय प्रकरण होते

फेब्रुवारीमध्ये शॉ त्याच्या मित्रांसोबत मुंबईतील (Mumbai) एका हॉटेलमध्ये गेला होता, जिथे सपना आणि तिच्या एका मित्राने त्याला सेल्फीसाठी तगादा लावला.

याबाबत शॉने हॉटेल मॅनेजरकडे तक्रार केली, त्यानंतर सपना आणि तिच्या मित्राला हॉटेलबाहेर काढण्यात आले. यामुळे संतापलेल्या सपनाने शॉ हॉटेलमधून बाहेर येताच गोंधळ घातला.

त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, सपनावर असाही आरोप करण्यात आली की, तिने शॉ कडे 50 हजार रुपयांची मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com