MS Dhoni Wicket: थालाच्या विकेटनंतर हार्दिक-मोहितच्या कृत्याचं होतंय कौतुक, फॅन्सच्या रिऍक्शनचीही चर्चा

आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात धोनीची विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्या आणि मोहित शर्माने केलेल्या कृत्याचे सध्या कौतुक होत आहे.
MS Dhoni | Hardik Pandya
MS Dhoni | Hardik PandyaDainik Gomantak

MS Dhoni Wicket Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी प्लेऑफमधील पहिला क्वालिफायरल सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला जात आहे. एम चिदंबरम (चपॉक) स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले आहे.

दरम्यान, या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी फलंदाजीला आला होता. मात्र, त्याला फार काही करता आले नाही आणि तो एक धावेवर बाद झाला. त्याला 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहित शर्माने बाद केले. धोनीचा झेल कव्हरच्या क्षेत्रात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने घेतला.

MS Dhoni | Hardik Pandya
IPL 2023 Playoff: प्लेऑफमधून कसे मिळणार दोन फायनालिस्ट? जाणून घ्या संपूर्ण फॉरमॅट

पण धोनीची विकेट घेतल्यानंतर त्याचा आदर करत मोहित शर्मा आणि हार्दिक या दोघांनीही मोठे सेलिब्रेशन केले नाही. त्याचमुळे त्यांचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

तसेच आणखी एका गोष्टीची धोनीच्या विकेटनंतर चर्चा झाली. ती म्हणजे ज्यावेळी धोनी फलंदाजीला आला होता, तेव्हा त्याला स्टेडियममध्ये त्याच्या नावाने मोठ्या प्रामाणात चाहत्यांकडून प्रोत्साहन दिले जात होते. मात्र, ज्यावेळी तो 1 धावेवर बाद झाला, त्यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये अचानक शांतता पसरली होती.

खरंतर यंदाच्या हंगामात धोनीची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता पाहायला मिळाली आहे. त्याचे चाहते चेन्नईने या हंगामात खेळलेल्या सर्वच मैदानावर त्याला पाठिंबा देताना दिसले आहेत. धोनीनेही चाहत्यांना निराश केलेले नाही. त्याने अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीला येत आक्रमक खेळ केला आहे.

व्हिडिओ पाहाण्यासाठी क्लिक करा

MS Dhoni | Hardik Pandya
विश्लेषण: कोहली, फाफ, कार्तिक... दिग्गजांचा भरणा, तरीही RCB आयपीएल का जिंकत नाही?

चेन्नईच्या 172 धावा

पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच डेव्हॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर अखेरीस रविंद्र जडेजानेही 22 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com