IPL 2023: धोनीच्या CSK ने मिळवलं प्लेऑफचं तिकीट! दिल्लीच्या पदरी शेवटीही पराभवच

शनिवारी चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफमधील स्थान पक्के केले.
Chennai Super Kings
Chennai Super KingsDainik Gomantak

Delhi Capitals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (20 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने धावांनी 77 विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

चेन्नई आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा गुजरात टायटन्सनंतरचा दुसराच संघ ठरला आहे.

या सामन्यात चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी 224 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 9 बाद 146 धावाच करता आल्या. दिल्लीचा हा अखेरचा सामना होता. त्यांचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते.

Chennai Super Kings
IPL 2023: आज बदलणार Playoff ची गणितं! चेन्नई-लखनऊ करणार थेट क्वालिफाय? पाहा समीकरणे

चेन्नईने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण शॉ दुसऱ्याच षटकात 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर पाचव्या षटकात दीपक चाहरने फिलिप सॉल्ट आणि रिली रोसौ यांना सलग चेंडूंवर बाद करत दिल्लीला मोठे धक्के दिले.

पण त्यानंतर यश धूलने वॉर्नरला चांगली साथ दिली. त्यांच्यात 49 धावांची भागीदारी झाली. मात्र, यश धूल 13 धावांवर बाद झाला. त्यानंतरही अक्षर पटेल आणि अमन हकिम खान यांनीही स्वस्तात विकेट गमावल्या. पण यादरम्यान वॉर्नरने एक बाजू सांभाळताना अर्धशतक पूर्ण केले.

पण त्याला 19 व्या षटकात मथिशा पाथिरानाने बाद केले. वॉर्नरने 58 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर ललित यादव आणि कुलदीप यादव यांनीही अखेरच्या षटकात सलग दोन चेंडूवर विकेट्स गमावल्या.

चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच महिश तिक्षणा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Chennai Super Kings
IPL 2023 च्या धामधुमीत BCCI ची WTC Final साठी योजना तयार! तीन तुकड्यात टीम इंडिया निघणार दौऱ्यावर

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना 141 धावांची दमदार भागीदारी केली. पण ऋतुराज 50 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 79 धावांची खेळी करून बाद झाला.

त्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला येत आक्रमक खेळ केला. पण तो 18 व्या षटकात 9 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात कॉनवेला नॉर्कियाने बाद केले. कॉनवेने 52 चेंडूत 87 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. अखेरीस रविंद्र जडेजाने फटकेबाजी करताना 7 चेंडूत 20 धावांची नाबाद खेळी केली. तसेच एमएस धोनी 5 धावांवर नाबाद राहिला.

दिल्लीकडून खलील अहमद, एन्रिच नॉर्किया आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com