IPL Auction: मुलासाठी बापाने सोडली नोकरी, आता कॅप्टन कूलच्या नेतृत्वाखाली खेळणार 'हा' क्रिकेटर

IPL 2023 Mini Auction: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग IPL च्या पुढील हंगामापूर्वी (IPL 2023) शुक्रवारी कोची येथे एक मिनी लिलाव आयोजित करण्यात आला.
MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak

IPL Mini Auction, Shaik Rasheed sold to CSK: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग IPL च्या पुढील हंगामापूर्वी (IPL 2023) शुक्रवारी कोची येथे एक मिनी लिलाव आयोजित करण्यात आला. यादरम्यान अनेक खेळाडूंचे नशीब चमकले आणि त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला. मात्र काहींची घोर निराशा झाली. दरम्यान, अशा तरुण फलंदाजाला 4 वेळा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने विकत घेतले, ज्याच्या वडिलांनी आपल्या कारकिर्दीसाठी बरेच काही पणाला लावले होते. आंध्र प्रदेशचा शेख रशीद आता CSK चे प्रतिनिधित्व करणार आहे.

रशीद चेन्नईकडून खेळणार

18 वर्षीय शेख रशीदला चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने 20 लाख रुपयांत विकत घेतले. चेन्नईचे कर्णधारपद अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकडे आहे. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असलेल्या शेख रशीदने त्यानंतर विजेतेपदाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. रशीदचे करिअर घडवण्यासाठी त्याचे वडील शेख बालीशा यांनी खूप संघर्ष केला. एवढेच नाही तर त्यांनी बँकेची (Bank) नोकरीही सोडली.

MS Dhoni
IPL Auction 2023: तब्बल 167 कोटींचा खर्च केल्यानंतर कसे आहेत सर्व 10 संघ, जाणून घ्या एका क्लिकवर

वडिलांनी नोकरी सोडली

रशीदचे वडील शेख बालीशा यांनी अंडर-19 विश्वचषकादरम्यान एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी मुलासाठी बँकेची नोकरी सोडली होती.' बालीशा यापूर्वी म्हणाले होते की, 'मला पूर्ण विश्वास आहे की, एक दिवस रशीद टीम इंडियाकडून खेळेल. अंडर-19 विश्वचषक ही नुकतीच सुरुवात आहे.' आंध्रच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघातही रशीदची निवड झाली होती, मात्र तो चांगली कामगिरी करु शकला नव्हता. यानंतर तो प्रचंड नैराश्यात गेला होता. रशीद 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपकर्णधार होता. त्यानंतर त्याने स्पर्धेतील 4 सामन्यात 201 धावा केल्या. रशीदचे वडील त्याला घरापासून 12 किमी दूर स्कूटरवरुन सरावासाठी घेऊन जायचे. मुलाच्या प्रशिक्षणामुळे ते रोज नोकरीला उशिरा पोहोचायचे. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.

MS Dhoni
IPL Auction 2023: एकाही भारतीयाला मिळाले नाहीत 10 कोटी; 'हे' ठरले भारताचे सर्वात महागडे क्रिकेटर्स

गुंटूर मध्ये जन्म

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) गुंटूर येथे जन्मलेल्या शेख रशीदने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 4 प्रथम श्रेणी सामने खेळले असून, एका अर्धशतकाच्या मदतीने त्याने 208 धावा केल्या आहेत. तो उजव्या हाताचा फलंदाज असून लेगब्रेक गोलंदाजीही करु शकतो. त्याने त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीत 3 सामन्यात 56 धावा केल्या आणि एक विकेटही घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com