MI नंतर पंजाब किंग्जला मिळाला नवा प्रशिक्षक, ट्रेव्हर बेलिस संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक

Trevor Bayliss: अनिल कुंबळे यांच्या जागी बेलिस यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
Trevor Bayliss
Trevor BaylissDainik Gomantak

Indian Premier League: पंजाब किंग्जने शुक्रवारी ट्रेव्हर बेलिस यांची पुढील हंगामापूर्वी नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अनिल कुंबळे यांच्या जागी बेलिस यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. भारताचा माजी कर्णधार अनिले कुंबळे यांच्या नेतृत्वाखाली संघ चमकदार कामगिरी करु शकला नव्हता.

पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याचा मला अभिमान आहे,” असे बेलिस यांनी फ्रँचायजीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 'पंजाब किंग्स ही अशी एक फ्रँचायझी आहे, जी येणाऱ्या काळात किताब जिंकू शकते. प्रतिभावान खेळाडूंनी भरलेल्या या संघासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे,' असेही बेलिस यांनी म्हटले.

Trevor Bayliss
IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्स मध्ये 'काटे की टक्कर'

दरम्यान, बेलिस हे अतिशय अनुभवी प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 2012 आणि 2014 मध्ये बेलिस यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद जिंकले, तर सिडनी सिक्सर्सला बिग बॅश लीगच्या विजेतेपदापर्यंत नेण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. बेलिस 2020 आणि 2021 च्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) मुख्य प्रशिक्षक होते. कुंबळे प्रशिक्षक असताना पंजाब किंग्ज संघ सलग तीन वर्षे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नाही.

Trevor Bayliss
सनरायझर्स हैदराबादच्या मलिकने IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू फेकला, मात्र....

मार्क बाउचर मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी

यापूर्वी, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दक्षिण आफ्रिकेचे माजी यष्टीरक्षक मार्क बाउचर यांना आयपीएल 2023 पासून मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. बाउचर महेला जयवर्धनेची जागा घेतील, ज्यांची संघाने अलीकडेच ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मंस म्हणून नियुक्ती केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com