IPL 2023: 'करो वा मरो' सामन्यात बेंगलोरची पहिली बॅटिंग, गुजरातने जिंकला टॉस! पाहा दोन्ही टीमची Playing XI

आयपीएल २०२३ स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे.
RCB vs GT
RCB vs GTDainik Gomantak

Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. हा सामना बेंगलोरच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी बंगळुरूमध्ये पाऊस पडत असल्याने नाणेफेकीला उशीर झाला होता.

या सामन्यासाठी गुजरातने प्लेइंग इलेव्हनमध्ये फार बदल केलेला नाही. पण बेंगलोरने एक बदल केला आहे. कर्ण शर्माऐवजी हिमांशू शर्माला बेंगलोरच्या संघात संधी देण्यात आली आहे.

RCB vs GT
RCB vs GT मॅचवर पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास कसे असेल IPL Playoff चे समीकरण?

या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बेंगलोरने कर्णधार फाफ डू प्लेसिसबरोबर ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल आणि वेन पार्नेल या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच गुजरातने दसून शनाका, डेव्हिड मिलर, राशीद खान आणि नूर अहमद या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

त्यामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच खेळवता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी बेंगलोरने राखीव खेळाडूंमध्ये हिमांशू शर्मा, सुयश प्रभूदेसाई, फिन ऍलेन, सोनू यादव आणि आकाश दीप यांना संधी दिली आहे. तसेच गुजरातने विजय शंकर, केएस भरत, शिवम मावी, साई किशोर आणि अभिनव मनोहर यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.

RCB vs GT
IPL 2023: ग्रीनचं शतक अन् मुंबईने ठोकली Playoff ची दावेदारी! हैदराबादचा शेवटच्या मॅचमध्ये दारुण पराभव

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा सामना बेंगलोरसाठी महत्त्वाचा आहे. गुजरातने यापूर्वीच गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. पण बेंगलोरला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात विजयाचीच गरज आहे. या सामन्यात पराभव स्विकारल्यास बेंगलोरचे आव्हान संपुष्टात येईल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख

  • गुजरात टायटन्स - शुभमन गिल, वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या(कर्णधाक), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com