Virat Kohli, Shubman Gill Century: गिलचे विराटच्या पावलावर पाऊल! एकाच सामन्यात दोघांचाही 'सेम टू सेम' रेकॉर्ड

आयपीएल 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून विराट कोहलीने आणि गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने शतकी खेळी केली होती.
Shubman Gill and Virat Kohli
Shubman Gill and Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli, Shubman Gill Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातच्या या विजयात शुभमन गिलने शतकी खेळी करत मोठा वाटा उचलला.

या सामन्यात बेंगलोरने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 197 धावा केल्या होत्या. बेंगलोरकडून विराटने 61 चेंडूत १३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद 101 धावा केल्या. 

त्यानंतर गुजरातने 198 धावांचे आव्हान 19.1 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. गुजरातकडून शुभमन गिलने 52 चेंडूत 104 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले.

Shubman Gill and Virat Kohli
Virat Kohli Century: किंग कोहलीचा नादच खुळा! सलग दुसरी सेंच्युरी करत IPL मध्ये रचला इतिहास

विराट - गिलची सलग शतके

दरम्यान, या सामन्यात विराट आणि शुभमन गिलने केलेली ही त्यांची सलग दुसरी शतके ठरली आहेत. विराटने 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध देखील 100 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याने आता गुजरातविरुद्धही शतक केले आहे. 

तसेच गिलने देखील याआधी सनरायझर्स हैदराबाविरुद्ध खेळतानाच १५ मे रोजी १०१ धावांची शतकी खेळी केली होती. त्यांनंतर त्याने रविवारी बेंगलोरविरुद्धही शतक केले आहे.

त्यामुळे आयपीएलमध्ये सलग दोन शतके करणारा विराट तिसरा, तर गिल चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2020 आयपीएलमध्ये शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आणि 2022 आयपीएलमध्ये जॉस बटलरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सलग दोन शतके केली होती.

Shubman Gill and Virat Kohli
IPL 2023: ग्रीनचं शतक अन् मुंबईने ठोकली Playoff ची दावेदारी! हैदराबादचा शेवटच्या मॅचमध्ये दारुण पराभव

गुजरातचा शतकवीर

दरम्यान, गिल हा गुजरात टायटन्सचा एकमेव शतकवीर आहे. तो हैदराबादविरुद्ध खेळताना 15 मे रोजी गुजरातसाठी शतक करणारा पहिला खेळाडू ठरला होता. आता त्याने बेंगलोरविरुद्ध 104 धावांची नाबाद खेळी केल्याने तो गुजरातकडून आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणाराही खेळाडू ठरला आहे.

गुजरात टायटन्सकडून सर्वोच्च धावांची खेळी करणारे खेळाडू -

  • 104* - शुभमन गिल (विरुद्ध, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०२३)

  • 101 - शुभमन गिल (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०२३)

  • 96 - शुभमन गिल (विरुद्ध पंजाब किंग्स, २०२२)

  • 94* - डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, २०२२)

  • 94* - शुभमन गिल (विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, २०२३)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com