IPL 2023: रिंकू सिंह लवकरच टीम इंडियासाठी खेळणार, 'या' दिग्गजाने केली भविष्यवाणी!

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये युवा फलंदाज रिंकू सिंह कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना विस्फोटक फलंदाजी करत आहे.
Rinku Singh
Rinku SinghDainik Gomantak

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये युवा फलंदाज रिंकू सिंह कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना विस्फोटक फलंदाजी करत आहे.

एका सामन्यात रिंकूने शेवटच्या षटकात पाच षटकार मारुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंहचा फॉर्म पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

तो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार असल्याचे सर्वांनाच वाटत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनेही रिंकूसाठी टीम इंडियाचा कॉल फार दूर नसल्याचे सांगितले.

याआधीही अनेक खेळाडूंनी रिंकू सिंहचे कौतुक केले आहे. यंदाच्या हंगामात रिंकूने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ते पाहता तो मधल्या फळीत टीम इंडियासाठी योग्य खेळाडू ठरु शकतो, असे वाटते.

रिंकूची आयपीएलमधील कामगिरी

रिंकू सिंहने 11 सामन्यांमध्ये 56.17 च्या सरासरीने आणि 151.12 च्या स्ट्राइक रेटने 337 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये नाबाद 58 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

त्याने आयपीएल (IPL) 2023 मध्ये आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. रिंकू सिंहसाठी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. गुरुवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.

केकेआरचे आतापर्यंत 11 सामन्यांतून पाच विजयांसह 10 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांचे आणखी दोन सामने आहेत, कारण ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत आहेत.

पण जर KKR ने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला तर संघाला टॉप 4 मध्ये स्थान मिळेल.

Rinku Singh
IPL 2023: धोनीच्या CSK चा सुपर 'विजय', दिल्ली कॅपिटल्स Play Off च्या शर्यतीतून बाद?

दरम्यान, टीम इंडियाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगचा विश्वास आहे की, 'रिंकूचा सध्याचा फॉर्म त्याला लवकरच टीम इंडियाची (Team India) कॅप मिळवून देईल.'

हरभजनने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाइव्हवर बोलताना सांगितले की, 'रिंकू लवकरच टीम इंडियामध्ये दिसेल. तो एक प्रेरणादायी खेळाडू आहे. आज तो जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com