Watch: KKR च्या विजयानंतर श्रेयस अय्यरने केला रिंकूला व्हिडिओ कॉल!

KKR ने IPL 2023 मधील त्यांचा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध जिंकला. केकेआरच्या या विजयात स्टार फलंदाज रिंकू सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली.
Shreyas Iyer & Rinku Singh
Shreyas Iyer & Rinku SinghDainik Gomantak

KKR ने IPL 2023 मधील त्यांचा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध जिंकला. केकेआरच्या या विजयात स्टार फलंदाज रिंकू सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली.

रिंकूने शेवटच्या पाच चेंडूंमध्ये 5 षटकार मारुन सामना तसेच चाहत्यांची मने जिंकली. या विजयानंतर श्रेयस अय्यरने रिंकू सिंगशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. दुखापतीमुळे अय्यर आयपीएलचा भाग होऊ शकला नाही.

अय्यरने रिंकू भैया जिंदाबादच्या घोषणा दिल्या

या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ KKRच्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग श्रेयस अय्यरशी बोलताना दिसत आहे. या कॉलवर रिंकू सिंगने सर्वप्रथम श्रेयसला त्याच्या प्रकृतीबद्दल विचारले.

यानंतर अय्यरने रिंकू भैया जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर केकेआरचा सध्याचा कर्णधार नितीश राणाही आला. त्यानेही रिंकूसोबत अय्यरशी संवाद साधला.

Shreyas Iyer & Rinku Singh
एकिकडे आनंद, दुसरीकडे निराशा! हॅट्रिक, सलग 5 सिक्स... नाट्यमय GT vs KKR सामन्याचा पाहा अखेरचा क्षण

दुसरीकडे, गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) खेळल्या गेलेल्या सामन्यात रिंकूने शानदार फलंदाजी केली. या सामन्यात रिंकूने 21 चेंडूत 228.57 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 48 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 1 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. यामध्ये शेवटच्या षटकात पाच षटकार मारले गेले.

Shreyas Iyer & Rinku Singh
Shahrukh Meet Acid Survivors : किंग खानला पाहताच फुलले चेहरे.. KKR च्या विजयानंतर शाहरुख भेटला अ‍ॅसिड सर्वायव्हर्सना...

व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणानेही शानदार खेळी केली

या सामन्यात रिंकू सिंगशिवाय फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनीही शानदार खेळी केली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अय्यरने 40 चेंडूत 207.50 च्या स्ट्राईक रेटने 83 धावा केल्या, तर नितीश राणाने 29 चेंडूत 155.17 च्या स्ट्राईक रेटने 45 धावा केल्या.

अय्यरच्या डावात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता आणि नितीशच्या डावात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com