नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातील (आयपीएल 2021) लिलाव आज चेन्नई येथे होणार आहे. खेळाडूंच्या अंतिम लिलाव यादीपैकी (आयपीएल लिलाव 2021) सर्व फ्रँचायझी 61 रिक्त जागांसाठी बोली लावतील.लिलाव यादीत 164 भारतीय, 125 परदेशी व सहयोगी देशांतील 3 खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

लिलाव फलंदाजांपासून सुरू होईल. यानंतर फ्रँचायझी अष्टपैलू आणि यष्टीरक्षकांवर बोली लावतील. लिलावा दरम्यान, सर्वात जास्त किंमतीत कोणता खेळाडू खरेदी केला गेला व कोणता खेळाडू कोणत्या संघाशी संबंधित होता आणि कोणत्या फ्रेंचायझीने सर्वाधिक खेळाडू विकत घेतले, यावर सर्वांचे लक्ष असतं. तथापि, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, आठ फ्रँचायझींना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे देखील पाळावी लागतील.
मॅक्सवेलवर, स्टिव्ह स्मिथवर लक्ष असेल

मॅक्सवेल आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ हे दोघेही सर्वाधिक बोली निविदेत आहेत ज्यांची रक्कम दोन कोटी रुपये आहेत. आयपीएल भारतात होत असल्याने मॅक्सवेलची कामगिरी खराब असूनही धीम्या खेळपट्टीवर ऑफ ब्रेक गोलंदाजीसाठी त्याची निवड होऊ शकते. एक नाव सर्वांच्याच केंद्रस्थानी असेल आणि तो म्हणजे इंग्लंड टी -२० क्रमांकाचा जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज डेव्हिड मालन 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 150 च्या आसपास आहे, ज्यामुळे या 33 वर्षीय खेळाडूची आधारभूत किंमत 1.5 कोटींपेक्षा जास्त आहे.
CSK कोणाला निवडणार?

मागील हंगामात (आयपीएल २०२०) चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट परिस्थिती होती, कारण त्यांचा संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्र ठरला नव्हता. महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग तरुणांपेक्षा त्यांच्या संघातील अनुभव असलेल्यांवर जास्त विश्वास ठेवतात. रॉबिन उथप्पा हे त्याचे उदाहरण आहे. धोनी कोणत्या प्रकारचे खेळाडू निवडतो ते पहावे लागेल. केदार जाधवला चेन्नई निवडणार कि नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सहा जागा भरण्यासाठी चेन्नईकडे २० कोटी रुपये असून धोनीने मधल्या फळीत सुरेश रैना आणि फाफ डुप्लेसिस यांना साथ देणाऱ्या कोणत्यातरी खेळाडूची CSK ला गरज आहे. भारतीय खेळाडूंमध्ये तीन 'कॅप्ड' खेळाडू फार महत्वाचे आहेत. ते म्हणजे केदार जाधव, अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव.

आता किंग्स इलेव्हन पंजाब नाही..किंग्स पंजाब

आता सर्वात जास्त रक्कम पंजाब किंग्जकडे आहे. यांनी प्रशिक्षित केली आहे. त्यांच्याकडे नऊ खएळाडूंसाठी 53.20 कोटी उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोरोना साथीमुळे आयपीएल आयोजित करण्यात आला होता. परंतु यावर्षी हे सामने भारतातच होत असल्याने निवडकर्त्यांना आता बिग हिटर आणि स्लो गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. ज्यासाठी, मॅक्सवेल आणि मोईन उत्तम आहेत.
या अनकॅप्ड खेळाडूंचादेखील समावेश होऊ शकतो.

केरळचा मोहम्मद अझरुद्दीन (जूनियर), तामिळनाडूचा शाहरुख खान, अष्टपैलू आर सोनू यादव, बडोदाचा विष्णू सोलंकी आणि बंगालचा आकाश दीप या 'अनकॅप्ड' (ज्याने कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत) स्थानिक खेळाडूंचीदेखील निवड होऊ शकते.यांची आधारभूत किंमत फक्त २० लाख रुपये आहे. सा अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचादेखील समावेश आहे.