IPL: स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

बंगळुरु संघाकडून ऑस्ट्रेलियाचा लेगस्पीनर गोलंदाज अ‍ॅडम झाम्पा मुंबईविरुध्दचा पहिला सामना खेळू शकणार नाही.

इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) च्या चौदाव्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. आयपीएल पर्वाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. 9 एप्रिल ला चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. तत्पूर्वी, बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरु संघाचा प्रमुख फिरकीपटू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे. बंगळुरु संघाकडून ऑस्ट्रेलियाचा लेगस्पीनर गोलंदाज अ‍ॅडम झाम्पा मुंबईविरुध्दचा पहिला सामना खेळू शकणार नाही. झाम्पा आपल्या लग्नामुळे हा सामना खेळणार नसल्याचे बंगळुरु क्रिकेट संघाचे संचालक माइक हेसन यांनी सांगितले. फ्रेंचायझीच्या ट्विटर हॅंडेलवर व्हिडिओ पोस्ट करुन यासंबंधीची माहिती दिली.

हेसन यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, ''पहिल्या सामन्यासाठी सर्व विदेशी खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. अ‍ॅडम झाम्पा लग्न करणार आहे. फ्रेंचायझीला त्याविषयी पूर्वकल्पना आहे. झाम्पा ज्यावेळी स्पर्धेत सामील होईल त्य़ावेळी आपले योगदान देईल.'' (IPL A big blow to Royal Challengers Bangalore before the tournament)

INDvsENG 1st ODI : टीम इंडियाचा पाहुण्या इंग्लंड संघावर दमदार विजय 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आयपीएलचा 13 हंगाम बरा गेला होता. उत्तम कामगिरी करुन ही हैद्राबादकडून पराभव स्वीकारत विराटसेनेला प्ले ऑफचा प्रवास थांबवावा लागला. आरसीबीने यंदाच्या हंगामात 35.40 कोटी पैकी 34 कोटी रुपये तीन अष्टपैलू खेळांडूवरती खर्च केले आहेत.

 

संबंधित बातम्या