‘आयपीएल’ मधील सट्टेबाजांचा पर्दाफाश

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

सट्टेबाजीसाठी सहाय्य करणाऱ्या एका व्यक्तिला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पाश्वभूमीवर नुकत्याच स्थगित झालेल्या इंडियन प्रीमिअर (IPL) टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर (Firoz Shah Kotla) पार पडलेल्या एका सामन्यादरम्यान सट्टेबाजीसाठी सहाय्य करणाऱ्या एका व्यक्तिला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (IPL bookies exposed)

एका सामन्यादरम्यान स्टेडियमवरील प्रेक्षागृहातून प्रत्येक चेंडूची माहिती सट्टेबाजांना पुरवल्याप्रकरणी चतुर्थ श्रेणीतील एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सट्टेबाजांकडून या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख खांडवावाला यांनी सांगितलं आहे.

प्रत्यक्ष सामना आणि टिव्हीवरुन होणाऱ्या थेट प्रक्षेपण यातील वेळफरकाचा लाभ घेऊन दिल्लीमधील एका आयपीएल सामन्यात प्रेक्षागृहातून चेंडूगणिक माहीती सट्टेबाजांना दिली असल्याचे सिध्द झालं आहे.

ICC च्या कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतने रचला इतिहास

दिल्ली पोलिसांनी कोटला येथून आणखी दोघांना अटक केली असून त्या दोघांनी 2 मे रोजी पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामन्याप्रसंगी बोगस प्रवेशपत्र बाळगलं होतं. त्याचबरोबर यातील एका व्यक्तीकडे दोन मोबाईल आढळल्याने अधिकाऱ्याला अधिक संशय आला. कोरोना काळात आयपीएलचे सामने जैव-सुरक्षा वातावरणात होत असल्याने सट्टेबाजांनी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याला आपल्या हाताशी घेतले होते, असंही खांडवावाला यांनी सांगितले.  

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने साट्टेबाजीस माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला तु इथं काय करतो म्हणून विचारलं, तर तेव्हा त्याने आपण प्रियेसीशी गुप्पा मारत असल्याचे अधिकाऱ्याला सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्याने पुन्हा फोन लावून मोबाईल देण्यास सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडण्यात आलं.
 

संबंधित बातम्या