IPL Mini Auction: सेहवागच्या पुतण्यावर पैशांचा वर्षाव, SRH ने करोडो केले खर्च; वडील MCD मध्ये कंत्राटदार

Sehwag relative Mayank Dagar: 26 वर्षीय अष्टपैलू मयंक डागरला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. दिल्लीत जन्मलेल्या मयंक डागरचे शिक्षण शिमल्याच्या शाळेत झाले.
Virender Sehwag
Virender SehwagDainik Gomantak

IPL Mini Auction, Mayank Dagar Price: आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी झालेल्या खेळाडूंच्या मिनी लिलावात टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या पुतण्यावरही पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे. 26 वर्षीय अष्टपैलू मयंक डागरला (Mayank Dagar) सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. दिल्लीत जन्मलेल्या मयंक डागरचे शिक्षण शिमल्याच्या शाळेत झाले आहे.

वडीलही क्रिकेट खेळायचे

मयंकचे वडील जितेंद्र डागर हे देखील विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहेत, जे सध्या दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) कंत्राटदार आहेत. विशेष म्हणजे, सेहवाग हा मयंकचा मामा आहे. मयंक हा उजव्या हाताचा फलंदाज असून लेफ्ट आर्म स्पिन करतो. अलीकडेच दिल्लीत झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात मयंकने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 92 धावांची शानदार खेळी खेळली होती.

Virender Sehwag
IPL Auction 2023: परदेशी 'ऑलराऊंडर' होणार मालामाल? 'या' तीन क्रिकेटर्सला मिळू शकते सर्वाधिक पसंती

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात घमासान

मयंक डागरसाठी बोली लावताना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात घमासान पाहायला मिळाले. त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये होती, त्यावर हैदराबादने बोली लावली. त्यानंतर राजस्थानने 25, 35 आणि 95 लाखांपर्यंत बोली लावली. हैदराबादने एक कोटी रुपयांची बोली लावली आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरुच राहिली. अखेर हैदराबादने त्याला 1.8 कोटींची बोली लावून विकत घेतले.

Virender Sehwag
IPL Auction 2023: विलियम्सन झाला गुजरात टायटन्सचा सदस्य, 'इतक्या' कोटींची लागली बोली

मयंक हा अष्टपैलू खेळाडू आहे

मयंक देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 29 सामन्यांत 87 बळी घेतले आणि एकूण 732 धावा केल्या. त्याचबरोबर, आपल्या एकूण टी-20 कारकिर्दीत मयंकने आतापर्यंत 44 सामन्यांत 44 बळी घेतले आहेत आणि 72 धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये 46 सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, एका अर्धशतकाच्या मदतीने लिस्ट ए मध्ये एकूण 393 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com