आयपीएल २०२०: एमएस धोनी पुन्हा ठरला पडद्यामागचा हिरो

धोनी पुन्हा ठरला पडद्यामागचा हिरो
धोनी पुन्हा ठरला पडद्यामागचा हिरो

अबुधाबी: संघाच्या विजयात मैदानात असताना भले त्याने एकही धाव केली नाही, परंतु तोच धोनी पुन्हा एकदा पडद्यामागचा हिरो ठरला. आयपीएलच्या सलामीला गतविजेत्या मुंबईला पराभूत करण्यात अंबाती रायडू, फाफ डुप्लेसी, सॅम करन हे शिल्पकार ठरले असले, तरी धोनीचे नेतृत्वकौशल्यच प्रभावशाली ठरले.

४३८ दिवसांनंतर धोनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला. शरीरयष्टी काहीशी बदललेली असली तरी सामन्याचे आकलन करण्याची आणि त्यानुसार डावपेचात बदल करण्याची त्याची गुणवत्ता पुन्हा एकदा कौतुकास पात्र ठरली. आम्ही कितीही पुरेसा सराव केलेला असला, तरी सामन्याच्या वेळी असलेली परिस्थिती ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार बदल करता आले पाहिजेत, असे धोनीने विजयानंतर सांगितले.

गोलंदाजीचा खुबीने वापर
सुरुवातीस त्याचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी फारच महागडा ठरला होता. (२ षटकांत २९) पण मुंबई संघावर दडपण येताच धोनीने एन्गिडीला गोलंदाजी दिली आणि त्याने २ षटकात ८ धावांत ३ विकेट मिळवले. त्याचप्रमाणे हार्दिक पंड्याने जडेजावर हल्ला चढवला असला, तरी जडेजाद्वारेच हार्दिकला बाद करण्याचा सापळाही धोनीने लावला. सुरुवातीला स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या डुप्लेसीला त्याने लाँगआफला उभे केले आणि त्याने सीमारेषेवर सौरव तिवारी आणि हार्दिकचे झेल पकडले.

डावी-उजवी जोडीचे बदल
धावांचा पाठलाग करताना धोनीने गरजेनुसार फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केले. रायडू बाद झाल्यावर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना लय मिळू नये म्हणून त्याने डावी-उजवी जोडी असावी म्हणून डुप्लेसीबरोबर अगोदर रवींद्र जडेजा आणि नंतर स्वतःला मागे ठेवून सॅम करनला फलंदाजीस पाठवले. करनने सहा चेंडूत एक चौकार आणि दोन षटकार मारून १८ धावा करताना विश्‍वास सार्थ ठरवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com