आयपीएल: मुंबई इंडियन्सच्या सलामीसाठी ऋतुराज गायकवाड अनुपलब्ध

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

ऋतुराज गायकवाडच्या अजून दोन चाचण्या निगेटिव्ह यायच्या आहेत, त्यामुळे तो आयपीएलच्या सलामीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सांगण्यात आले आहे.

दुबई: ऋतुराज गायकवाडच्या अजून दोन चाचण्या निगेटिव्ह यायच्या आहेत, त्यामुळे तो आयपीएलच्या सलामीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सांगण्यात आले आहे.

चेन्नई संघातील दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. ऋतुराजचे दोन आठवड्यांचे विलगीकरण पूर्ण झाले आहे. त्याला आता कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु नियमानुसार त्याने दोन चाचण्या पास करणे महत्त्वाचे आहे, त्यानंतर तो संघात दाखल होईल, आम्ही सुद्धा बीसीसीआयकडून हिरवा कंदील दाखवला जाण्याची वाट पाहात आहोत, त्यानंतर ऋतुराजची तंदुरुस्ती चाचणी घेतली जाईल, असे चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्‍वनाथ यांनी सांगितले. तो पहिला सामना कधी खेळेल हे दोन दिवसांत समजेल, असेही ते म्हणाले.

संघापासून वेगळे असलेल्या हॉटेलमध्ये ऋतुराज राहात असून कोरोनामुक्त झाल्यावर तो संघाच्या हॉटेलमध्ये परतेल, दीपक चहलाही ही सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागली, आता तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती विश्‍वनाथ यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या