IPL च्या 7 सट्टेबाजांवर CBI ची कारवाई
IPLDainik Gomantak

IPL च्या 7 सट्टेबाजांवर CBI ची कारवाई

IPL क्रिकेटच्या 2019च्या हंगामात सामनानिश्चिती आणि सट्टेबाजी केल्याच्या आरोपांसह दोन वेगवेगळय़ा खटल्यांमध्ये एकूण सात जणांवर सीबीआयने शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेटच्या 2019च्या हंगामात सामनानिश्चिती आणि सट्टेबाजी केल्याच्या आरोपांसह दोन वेगवेगळय़ा खटल्यांमध्ये एकूण सात जणांवर सीबीआयने शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. (IPL speculator action)

IPL
लिटल गौर्स लीगमध्ये युवा फुटबॉलपटूंनी दाखवले कौशल्य

सीबीआय’ने या प्रकरणाचा देशभर तपास सुरू केला असून दिल्ली, हैदराबाद, जयपूर आणि जोधपूरमधील सात ठिकाणांवर छापेमारी केली. पाकिस्तानमधून (Pakistan) मिळणाऱ्या माहितीच्या आधारे काही व्यक्ती ‘आयपीएल’मधील सामन्यांवर सट्टेबाजी करताना आढळून आले. तसेच त्यांनी सामनानिश्चितीचाही प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे, अशी ‘सीबीआय’ला माहिती मिळाल्याचा दावा FIR मध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या संबंधांचा देखील शोध सुरू आहे.

या सर्व प्रकरणी ‘सीबीआय’ने दिलीप कुमार (रोहिणी, दिल्लीचा रहिवासी), गुर्राम वासू आणि गुर्राम सतीश (दोघेही हैदराबाद) यांचे नाव पहिल्या ‘एफआयआर’मध्ये नोंदवले आहे. दुसऱ्या ‘एफआयआर’मध्ये सज्जन सिंह, प्रभू लाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा हे सर्व राजस्थान मधील असून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

IPL
उमरान मलिक पर्पल कॅप जिंकण्याच्या शर्यतीत, आघाडीच्या गोलंदाजापासून 5 विकेट्सने मागे

राजस्थानमध्ये हा सर्व प्रकार 2010 पासून सुरू होता. तसेच दुसऱ्या प्रकरणाला 2013 पासून सुरुवात झाल्याचे आरोपींकडून ‘सीबीआय’ला सांगण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानमधून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे लोकांना ‘आयपीएल’ सामन्यांवर सट्टेबाजी करण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक केल्याचेही आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले आहे. बनावट ओळखपत्रांच्या आधारे आरोपींनी बँकांमध्ये खातेही उघडले होते. ‘‘खोटी जन्मतारीख आणि अन्य खोटय़ा माहितीच्या आधारे या व्यक्तींनी बँकांमध्ये खाते उघडली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची माहिती पडताळून न पाहताच त्यांना खाते उघडू दिले होते. तसेच सट्टेबाजीच्या आधारे भारतीय व्यक्तींकडून मिळवलेली रक्कम ही आरोपी परदेशातील त्यांच्या साथीदारांना पाठवत असल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोटय़वधींच्या ठेवी

दिलीप हा आरोपी 2013 सालापासून विविध बँक खाती हाताळत होता आणि या खात्यांमध्ये त्याने 43 लाखांहून अधिक रक्कम जमा केल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात उघड झाले. तसेच गुर्राम सतीश हा आरोपी सहा बँक खाती हाताळत होता आणि 2012 ते 2020 या कालावधीत या खात्यांमध्ये 4.55 कोटी स्वदेशी तसेच 3.05 लाख परदेशी रुपयांच्या रोख ठेवी होत्या, असे ‘सीबीआय’ला आढळून आले आहे. याच काळात गुर्राम वासूच्या बँक खात्यांमध्ये 5.37 कोटी रुपयांच्या ठेवी देखील होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.