IPL: तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज; पहिले 2 भारतीय  

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली आहे. या हंगामात सुरेश रैना (Suresh Raina) खेळत होता आणि तो सीएसकेचा (Chennai Super Kings) भाग होता. मागील वर्षी रैनाने वैयक्तिक कारणास्तव लीगमध्ये भाग घेण्यास नकार दिला होता, पण यावेळी भारतात झालेल्या या लीगमध्ये रैना चेन्नईकडून खेळताना दिसला. तथापि, त्याने या हंगामात सीएसकेसाठी 7 सामने खेळले, त्यातील कामगिरी निराशाजनक होती. रैनाने 7 सामन्यांत 123 धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 54 धावा होती. (The top 5 batsmen to score the most runs while playing at number three; The first 2 Indians)

ICC च्या कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतने रचला इतिहास

सुरेश रैना आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू असून त्याने 200 सामन्यांत 5,491 धावा केल्या आहेत. त्यापैकी तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 4,931 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर असून त्याने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना एकूण 2,696 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली असून त्याच्या नावावर एकूण 6076 धावा आहेत.

रैना आणि विराटनंतर आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स  तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. एबीने या लीगमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना एकूण २१७६ धावा केल्या असून या लीगमध्ये त्याच्या नावावर एकूण ५०५६  धावा आहेत. या प्रकरणात मनीष पांडे चौथ्या तर संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर आहे.

AFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी

तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धाव करणारे पहिले ५ खेळाडू 
4931 धावा- सुरेश रैना 
2696 धावा- विराट कोहली 
2176 धावा- एबी डिविलियर्स 
1776 धावा- मनीष पांडे 
1685 धावा- संजू सैमसन 

संबंधित बातम्या