आयपीएल२०२०: दिल्लीची सरशी; धोनी मैदानात येऊनही चेन्नईचा पराभव

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

चेन्नईला २६ चेंडूत ७८ धावांची गरज असताना धोनी मैदानात आला पहिल्या चेंडूवर तीन आणि पुढच्या चेंडूवर चौकार मारुन त्याने शानदार सुरवात केली, परंतु विजयाच्या आव्हानातली दरी वाढत गेल्यामुळे धोनी आणि त्याच्या संघाच्या पदरी निराशाच आली. धोनीला १५ धावाच करता आल्या.

दुबई: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपीटलने चेन्नई सुपर किंग्जचा ४४ धावांनी पराभव करुन यंदाच्या आयपीएलमधला दुसरा विजय मिळवला. महेंद्रसिंग धोनी मैदानात येऊनही तो संघाला वाचवू शकला नाही.

चेन्नईला विजयासाठी १७६ धावांची गरज होती. अशा परिस्थितीत धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस येतो आणि संघाला जिंकून देतो का याकडे सर्वांचे लक्ष होते परंतु चेन्नईला २६ चेंडूत ७८ धावांची गरज असताना धोनी मैदानात आला पहिल्या चेंडूवर तीन आणि पुढच्या चेंडूवर चौकार मारुन त्याने शानदार सुरवात केली, परंतु विजयाच्या आव्हानातली दरी वाढत गेल्यामुळे धोनी आणि त्याच्या संघाच्या पदरी निराशाच आली. धोनीला १५ धावाच करता आल्या.

पृथ्वी शॉ चमकला
पृथ्वी शॉच्या पहिल्याच षटकात त्याच्या बॅटला लागून गेलेला चेंडू धोनीने पकडलाही होता, परंतु बॅट कट कोणालाही ऐकू आली नाही. या जीवदानाचा फायदा घेत पृथ्वीने काही शानदार चौकार मारत ६४ धांवांची खेळी केली 

संक्षिप्त धावफलक: दिल्ली: २० षटकांत ३ बाद १७५ (पृथ्वी शॉ ६४ -४३ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, शिखर धवन ३५ -२७ चेंडू ३ चौकार, १ षटकार, रिषभ पंत २६ - २२ चेंडू, १ चौकार, चावला ३३-२) वि. चेन्नई: २० षटकांत २० षटकांत ७ बाद १३१ (फाफ डुप्लेसी ४३ -३५ चेंडू, ४ चौकार, केदार जाधव २६ - २१ चेंडू ३ चौकार, रबाडा २६-२, नॉर्जे २१-२)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या