`मी सोडलेल्या झेलांमुळेच आमचा पराभव`: विराट कोहली

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

कोहली राहुलला प्रथम जीवदान दिले, त्या वेळी तो ऐंशी धावांवर होता. त्यानंतर पुन्हा कोहलीने सीमारेषेवर त्याचा झेल सोडला. हे झेल सुटले नसते, तर पंजाबला दोनशेची मजल मारता आली नसती, असे कोहलीने सांगितले.

दुबई: केएल राहुलचे अखेरच्या षटकात माझ्याकडून दोन झेल सुटले. त्याचा आमच्या संघाला फटका बसला, असे विराट कोहलीने सांगितले. याद्वारे त्याने आपण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या पराभवास जबाबदार आहोत, अशीच कबुली दिली.

कोहली राहुलला प्रथम जीवदान दिले, त्या वेळी तो ऐंशी धावांवर होता. त्यानंतर पुन्हा कोहलीने सीमारेषेवर त्याचा झेल सोडला. हे झेल सुटले नसते, तर पंजाबला दोनशेची मजल मारता आली नसती, असे कोहलीने सांगितले. दोन जीवदानांचा फायदा घेत राहुलने अखेरच्या षटकात बंगळूर गोलंदाजांवर हल्ला केला आणि त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली.

पराभवाची जबाबदारी मला घ्यावीच लागेल. आजचा दिवस खूपच वाईट होता. केएल राहुलच्या सुटलेल्या झेलांनी आम्हाला ३५-४० धावांचा फटका बसला. आम्ही त्यांना १८० च्या आसपास रोखले असते, तर पहिल्या चेंडूपासून धावगतीचे दडपण आले नसते, असे कोहलीने सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या