IPL2021 : हिटमॅनच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय 'हिट'

IPL2021 : हिटमॅनच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय 'हिट'
IPL2021 Mumbai Indians have shared a video of Rohit Sharma daughter Samaira on social media

नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. आगामी हंगामासाठी भारतीय खेळाडू आता आपापल्या फ्रँचायझीमध्ये सामील झाले आहेत. भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचा संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा जो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्सला विक्रमी पाचवेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला यंदाच्या हंगामात जेतेपदाची हॅट्रिक करण्याची संधी आहे.  

मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलची संपूर्ण स्पर्धा ही युएईमध्ये बायोबबलमध्ये पार पडली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच  यावर्षीही खेळाडूंना बायो-बबलच्या नियमावलीचे पालन करावे लागेल. यापरिस्थितीतही काही फ्रॅन्चायझींनी खेळाडूंना कुटुंबीयांसह प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.
बुधवारी मुंबई इंडियन्सने (MI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रोहितची मुलगी समायरा आणि त्याची पत्नी  रितिका सजदेह दिसत आहे.

मुंबई इंडियन्सचा लोगो ओळखण्यापासून ते रोहित शर्माच्या पुल शॉटची नक्कल करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी समायराला स्पष्टपणे समजल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. मुंबई इंडिन्सचा संघ, चाहते जितके उत्सुक आहेत तितकीचा उत्सुकता या चिमुकलीमध्येही दिसून येते. जेव्हा समायरा सर्वांचे मनोरंजन करीत होती तेव्हा तिने लोगो पाहून फ्रँचायझीचे नाव कसे ओळखले, असा प्रश्नही काही नेटकऱ्यांना पडला आहे.रोहित शर्माने आपले हेल्मटे समायराला घातले. सहाजिकच तिला ते बसले नाही. यावर रोहित शर्माने खास कमिंटही केलेय. माझ्या हेल्मटमध्ये तू रिषभ चाचूसारखी दिसतेस, असे तो मजेशीरपणे म्हणताना ऐकायला मिळते. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत होणार आहे. यापूर्वी अनेक सामन्यात समायरा स्टेडियममध्ये येऊन मॅच पाहताना दिसली आहे. रितिका आणि ती पुन्हा स्टेडियममध्ये दिसणार का? हे पाहावे लागेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com