IPL2021: धोनी म्हणाला, लोभ इज कूल!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

यपीएल 2021ची 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी त्याचा कम्पेन व्हिडिओ लाँच केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी त्याच वेषात दिसला आहे

नवी दिल्ली: आयपीएल 2021ची 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी त्याचा कम्पेन व्हिडिओ लाँच केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी त्याच वेषात दिसला आहे, ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी त्याच्या एका फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओ कम्पेनमध्ये आयपीएलला  'भारताचा मंत्र' असे सांगितले गेले आहे.

आयपीएलमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कम्पेन व्हिडिओ’ मध्ये काही मुलांसोबत धोनीला मार्शल आर्ट कॅम्पमध्ये दाखवले आहे. येथे धोनी मुलांना लोभाचा धडा शिकवत आहे. तो त्यांना लोभाची कहाणी सांगतो, जी हिटमन रोहित शर्माशी संबंधित आहे.

धोनी म्हणाला, लोभ इज कूल

धोनी व्हिडिओमध्ये मुलांसोबत कथेच्या शैलीत बोलतांना दिसतो सिंहाची कथा सांगून मुलांना प्रश्न विचारतो  यावर, एक लहान मुले उत्तर देतात. पण त्यानंतर धोनी कथेचा सार सांगतांना लोभी असणे ही चांगली गोष्ट आहे, असे मुलांना सांगतो. व्हीआयव्हीआय आयपीएलमधील हा भारताचा नवा मंत्र आहे.

IndvsEng T20: मालिका थांबली नाही तर मी आत्महत्या करेन 

सीएसके संघ आयपीएल 2021 मध्ये बदलताना दिसणार

आयपीएल 2021 ची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यासह होईल. या हंगामात धोनीने आपल्या संघातील काही नवीन तरूण आणि अनुभवी खेळाडूंच्या प्रवेशामुळे थोडा बदल केला आहे. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरू आणि मुंबई या सहा शहरांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेचे प्लेऑफ व अंतिम सामने होणार आहेत. 51 दिवसांत एकूण 60 सामने होणार असून, अंतिम सामना 30 मे रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या