इराणच्या पर्सेपोलिस संघाची विजयी सलामी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत गतउपविजेत्या इराणच्या पर्सेपोलिस संघाने बुधवारी विजयी सलामी दिली.

पणजी: कर्णधार जलाल होसेनी याने पूर्वार्धात नोंदविलेल्या एका गोलच्या बळावर आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत गतउपविजेत्या इराणच्या पर्सेपोलिस संघाने बुधवारी विजयी सलामी दिली. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबला 1-0 फरकाने हरविले. 

ई गटातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 40व्या मिनिटास नोंदविलेल्या गोलमुळे पर्सेपोलिस संघाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त करत गुणतक्त्यात खाते उघडले. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतील त्यांचा हा अल वाहदा क्लबविरुद्ध सहा सामन्यांतील तिसरा विजय ठरला. पर्सेपोलिस संघाने गतवेळच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठत उपविजेतेपद मिळविले होते. (Irans Persepolis win)

Goa Professional League: इंज्युरी टाईम गोलमुळे वास्को विजयी

पर्सेपोलिस संघाचा पुढील सामना शनिवारी कतारच्या अल रय्यान क्लबविरुद्ध होईल, तर त्याच दिवशी अल वाहदा क्लब भारताच्या एफसी गोवा संघाविरुद्ध खेळेल.
 

संबंधित बातम्या