विराटने दिलेल्या आदेशाचा इशानने केला खुलासा

Ishaan revealed the order given by Virat
Ishaan revealed the order given by Virat

अहमदाबाद: भारत- इंग्लड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्थातच स्वत: च्या पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक इशान किशानने 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावला. इशानने आपल्या 32 चेंडूमध्ये 56 धावांची दमदार खेळी करत चौकार, षटकारांची मैदानात बरसात केली आणि मैदानामधील क्रिकेट चाहत्यांची मने जिकंली.

सामन्यानंतर फिरकीपटू यजुवेंद्र चहल याने यष्टीरक्षक इशान किशनची एक खास मुलाखत घेतली. या मुलाखतीचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिलं होतं. इशानने उत्तुंग षटकारासह आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. परंतु अर्धशतकानंतर त्याने आपली बॅट उंचावली नव्हती. त्यावरुन बॅट का उंचावली नाही यासंबंधी चहलने मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला, त्यावर त्याने उत्तर देताना म्हटले की, ‘’मी त्यावेळी नर्वस झालो होतो. माझं अर्धशतक झालं हे मला माहितच पडलं नाही. मात्र विराट भाईने टॉप इंनिग म्हटल्यानंतर मला अर्धशतक झाल्याचं लक्षात आलं. मी अर्धशतक झाल्यानंतर शक्यतो बॅट उंचावत नाही. क्वचितच बॅट उंचावतो.... परंतु पाठीमागून विराट भाईचा आवाज आला.... ओयो, चारही बाजूंना फिरुन बॅट दाखव.... पहिलाच सामना आहे तुझा बॅट दाखव चार बाजूंनी... मस्त.. आणि त्यावेळी मी बॅट उंचावली, असं इशानने सांगितले. आणि विराट यांच हे वाक्य मला आदेशाप्रमाणे वाटले’’.. असं इशानने चहलशी गप्पा मारताना सागिंतले...

टीम इंडियाने 3 विकेट्स राखत 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण करत पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला. पाच सामन्य़ांच्या टी- 20 मालिकेमध्ये भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीमध्ये पराभव करत 1-1 ने बरोबरीने साधली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये आक्रमक य़ष्टीरक्षक फंलदाज इशान किशनला फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याने दमदार खेळी करत आपली संघातील निवड सार्थ ठरवत त्याने 28 चेंडूमध्ये दमदारपणे अर्धशतक ठोकले.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com