इशानच्या ''या'' कृतीने जिंकली क्रिकेट प्रेमींची मनं

इशानच्या ''या'' कृतीने जिंकली क्रिकेट प्रेमींची मनं
Ishaans Yaa action won the hearts of cricket lovers

अहमदाबाद: भारत- इंग्लड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्थातच स्वत: च्या पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक इशान किशानने 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावला. इशानने आपल्या 32 चेंडूमध्ये 56 धावांच्या दमदार खेळी करत चौकार,षटकारांची मैदानात बरसात केली आणि  मैदानामधील क्रिकेट चाहत्यांची मने जिकंली.

 दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लडने टीम इंडियाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिलं होतं. ते आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्स राखत 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण करत पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला. पाच सामन्य़ांच्या टी- 20 मालिकेमध्ये भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीमध्ये पराभव करत 1-1 ने बरोबरीने साधली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये आक्रमक य़ष्टीरक्षक फंलदाज इशान किशनला फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याने दमदार खेळी करत आपली संघातील निवड सार्थ ठरवली आणि 28 चेंडूमध्ये दमदारपणे अर्धशतक ठोकले.

सुरुवातीलाच इंग्लडच्य़ा भेदक गोलंदाजीची हवा काढत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. इशान किशनला त्याच्या दमदार खेळीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. परंतु त्याने सामनावीराचा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केला.

टी-20 सामन्यामध्ये पदार्पण करताच 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळणारा इशान किशान हा सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. पण त्याने हा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पीत केला. ''माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचं निधन काही दिवसांपूर्वी निधन झालं. आजची खेळी ही त्यांच्यासाठी होती. आणि मला स्वत:लाही सिध्द करायचं होतं. कारण माझ्या वडिलांसाठी अर्धशतक तरी झळकावावंच लागेल असं प्रशिक्षक म्हणाले होते. त्यामुळेच मी हा पुरस्कार त्य़ांना समर्पीत करत आहे,'' असं इशान म्हणाला. पदार्पण सामन्यामध्येच इशानने सामनावीराचा मिळालेला पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पीत केला, त्यामुळे त्याच्यावर समाजमाध्यमातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com